पुणे

शेतकरी नियोजन - केळी

CD

वाढीच्या अवस्थेनुसार सिंचन,
अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

शेतकरी नियोजन ः केळी
.................................
शेतकरी ः संजय नारायण चौधरी
गाव ः हिंगणे बुद्रुक, ता. जामनेर, जि. जळगाव
एकूण क्षेत्र ः सात एकर
केळीखालील क्षेत्र ः दोन एकर (तीन हजार झाडे)
.....................
जळगाव जिल्ह्यातील हिंगणे बुद्रुक (ता. जामनेर) येथील संजय चौधरी यांची सात एकर वडिलोपार्जित मध्यम व काळी कसदार शेती आहे. केळी प्रमुख पीक असून सोबतच कांदा बीजोत्पादन, तीळ, चवळी, गवार ही पिके घेतात. केळीमध्ये प्रामुख्याने कांदेबाग (नोव्हेंबर, डिसेंबर लागवडीची बाग) केळी लागवड असते. लागवडीसाठी १०० टक्के उतिसंवर्धित रोपांचा उपयोग केला जातो. ग्रॅण्ड नैन या जातीच्या रोपांची पाच बाय पाच फूट या अंतरावर लागवड केली जाते. या माध्यमातून निर्यातक्षम केळीचे उत्पादन सातत्याने घेतले जात आहे. शेतीमध्ये पुतणे सुनील चौधरी यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते.
या हंगामात त्यांनी दोन एकरांत साधारणपणे डिसेंबर २०२५ मध्ये केळी लागवड केली आहे. आता बाग पाच महिन्यांची झाली असून बाग निसवणीवर आहे. केळी बागेत फुटवे नुकसानकारक असतात. फुटवे अधिक वाढल्यास मुख्य झाडाची वाढ कमी होते. त्यामुळे सध्या बागेतील फुटवे दर १५ ते २० दिवसांनी काढून घेण्याचे काम सुरू आहे.
---------------------------
व्यवस्थापनातील बाबी ः
- यंदा संपूर्ण दोन एकरांतील केळी लागवड एकाच टप्प्यात केली आहे. काही वेळेस तीन एकरांत तर काही वेळेस दोन एकरांत केळी लागवड असते. यंदाच्या हंगामातील लागवड साधारणपणे डिसेंबर २०२५ मध्ये करण्यात आली. आता बाग पाच महिन्यांची झाली असून पिकात चांगली वाढ दिसून येत आहे.
- केळी लागवडीपूर्वी शेतात शेणखताचा एकरी चार ट्रॉली प्रमाणे वापर केला. त्यानंतर जमिनीची खोल नांगरणी करून शेत तापू दिले. लागवडीपूर्वी जमीन चांगली भुसभुशीत झाल्यानंतर केळी लागवड सुरू केली.
- लागवडीपूर्वी केळी बागेस रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. बेसल डोसमध्ये प्रति एक हजार झाडांना पोटॅश, युरिया, १०.२६.२६ या खतांचा डोस दिला. त्यानंतर अन्य सरळ व मिश्र खतांचा उपयोग केला. रासायनिक खतांचे आलटून पालटून चार वेळेस चार महिन्यांत डोस दिले. दरवर्षी विद्राव्य खतांचा अधिक वापर केला जातो. मात्र यंदा प्रायोगिक तत्त्वावर विद्राव्य खतांचा वापर पूर्णपणे टाळला आहे.
- सिंचनासाठी १२ मिमीच्या लॅटरलचा वापर केला आहे. दोन ड्रीपमध्ये साधारण सव्वा फूट अंतर राखले आहे.
- रोपांची लागवडी करण्यापूर्वी सऱ्या चांगले भिजवून घेतल्या. त्यानंतर लागवड करण्यात आली.
- लागवडीनंतर सुरुवातीला काळात कीडनाशक, बुरशीनाशके यांच्यासह रासायनिक खतांचा आळवणीद्वारे वापर केला. त्यात सूक्ष्म अन्नद्रव्ये, कॅल्शिअम नायट्रेट, बोरॉन यांची तीन वेळेस आळवणी केली. सुरुवातीच्या काळात १२.६१.० नंतर १९.१९.१९ ही विद्राव्य खतेही दिली. त्यामुळे केळी बाग सध्या जोमात आहे.
वाढते तापमान आणि जमिनीतील वाफसा स्थिती तपासून सिंचन करण्यावर भर देण्यात आला. आवश्यकतेनुसार ठिबकचा कालावधी कमी-जास्त करण्यात आला.
- केळी बागेत करपा रोग, कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) तसेच इतर कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हवामान स्थितीचा अंदाज आणि पिकाचे निरीक्षण करून रासायनिक फवारण्यांचे नियोजन करण्यात आले. घडांचा दर्जा राखण्यासाठी घडांवरही शिफारशीत बुरशीनाशके आणि संप्रेरकांच्या फवारण्या घेतल्या जातात. घड काढणीपर्यंत साधारण नऊ फवारण्या घेतल्या जातात. आतापर्यंत पिकात चार फवारण्या घेतल्या आहेत.
- केळी बागेचे गणित पावसावर अवलंबून आहे. कारण कांदेबाग केळीची निसवण पावसाळ्यात होते. पाऊस लांबल्यास निसवणीवर परिणाम होतो. बागेची स्थिती पाणी व रासायनिक खतांचा संतुलित वापर केल्यामुळे आतापर्यंत बाग उत्तम स्थितीत आहे.
----------------------
आगामी नियोजन ः
- केळी बागेत फुटवे नुकसानकारक असतात. फुटवे अधिक वाढल्यास मुख्य झाडाची वाढ कमी होते. आता केळी बाग निसवणीवर आहे. त्यामुळे केळी बागेत दर १५ ते २० दिवसांत फुटवे काढून घेतले जातीत.
- मागील काही दिवसांत कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे केळी बागेच्या झाडांवरील पाने काढण्याचे काम सुरू केलेले नाही. कारण बागेत उष्णतेच्या काळात जेवढी अधिक केळी पाने राहतील, तेवढा वाफसा, ओलावा टिकण्यास मदत होते.
- उष्णता अधिक असल्याने सध्या रोज किमान चार तास सिंचन केले जात आहे. मार्च महिन्यापासून सिंचनाचा कालावधी वाढविला आहे. आगामी काळात पाऊस झाल्यास सिंचनाचा कालावधी कमी केला जाईल. बागेत वाफसा स्थिती कायम राखण्यावर भर दिला जाईल.
- बागेच्या वाढीच्या अवस्थेनुसार रासायनिक खतांच्या मात्रा वेळापत्रकानुसार दिल्या जातील. त्यात अन्नद्रव्ये व सरळ खते दिली जातील.
- सिंचनाचे काटेकोर व्यवस्थापन करण्यासाठी तोट्या स्वच्छ केल्या जातील.
- केळी बागेतील अतिरिक्त फुटवे वेळोवेळी काढून घेतले जातील. हिरवी पाने उष्णतेत कापली जाणार नाहीत.
- केळी बाग परिसराजवळ वनक्षेत्र असल्याने वन्यप्राण्यांचा उपद्रव होतो. वन्यप्राणी केळी बागेचे मोठे नुकसान करतात. यामुळे बागेच्या संरक्षणावरही लक्ष ठेवले जाईल.
--------------------------
- संजय चौधरी, ९९२३३४४९४६
(शब्दांकन ः चंद्रकांत जाधव)

फोटो ः
संजय चौधरी PNE26W20802
कांदे बहर धरलेली केळी बाग. PNE26W20801
केळी बागेत लगडलेले घड.PNE26W20803
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC 2027 परीक्षा कॅलेंडर जाहीर! जाणून घ्या CSE, NDA, CDS, Engineering आणि CAPF परीक्षांच्या तारखा; विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट

स्टार प्रवाहची नवी जोडी! 'पाठराखीण'मध्ये गौरी इंगवलेसोबत दिसणार 'हा' डॅशिंग अभिनेता; तीन वर्षांनी करतोय पुनरागमन

धोनी CSK च्या शेवटच्या साखळी सामन्यापूर्वीच रांचीत परतला! आता IPL मध्ये खरंच खेळताना दिसणार नाही?

Viral Farmer Video : वय विसरला अन् लहान मुलासारखा पिकावरुन मारल्या उड्या! भरघोस पीक आल्यावर शेतकऱ्याचा तो आनंद पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

West Bengal : बंगालमधील मदरशांमध्येही ‘वंदे मातरम’ गाणे बंधनकारक; शुभेंदू अधिकारी यांचा मोठा!

SCROLL FOR NEXT