पुणे

केळीच्या आवकेत मोठी घट

CD

केळीच्या आवकेत मोठी घट

बऱ्हाणपूरमधील व्यापारी लॉबी दर पाडत असल्याचा आरोप

ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात मागील आठवड्यात केळीच्या आवकेत मोठी घट झाली आहे. मात्र दर अस्थिर असून, ऐन सणासुदीच्या काळात खानदेश आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरमधील व्यापारी लॉबी दर पाडत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
खानदेशात केळीची थेट किंवा शिवार खरेदी केली जाते. सध्या खानदेशात दर्जेदार केळी काढणीवर आली आहेत. मध्य प्रदेशात मात्र जुनारी बागा आणि पिलबाग केळीमधून आवक होत असून, बाजार समितीत लिलाव केले जात आहेत. तेथे कमी दर्जाच्या केळीची आवक अधिक आहे. मागील पाच ते सहा दिवसांत बऱ्हाणपूरमधील केळीच्या दरात सातत्याने घट झाली आहे. आवकेत घट होऊनही दर कमी झाल्याचे चित्र आहे.
शुक्रवारी (ता. १९) तेथील केळीला कमाल २३२१ रुपये, तर किमान १४०० आणि ६०० रुपये प्रति क्विंटल दर जाहीर झाले. तेथे दररोज ८८ ते ९० ट्रक केळीची आवक होत आहे. एका ट्रकची क्षमता १२ ते १८ टन आहे. सात ते आठ दिवसांपूर्वी दररोज सरासरी १२० ट्रक केळीची आवक होत होती.
दुसरीकडे, खानदेशात बऱ्हाणपूरमधील दरांनुसार केळीची खरेदी केली जात आहे. तेथील दरांमधील घडामोडींचा दाखला देत खानदेशातील खरेदीदारही कमी दरात केळी खरेदी करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे रावेर आणि चोपडा येथे केळीचे लिलाव करून दर जाहीर करावेत आणि त्यानुसार शिवार खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
जळगाव जिल्ह्यात केळी दर समितीकडून दर जाहीर केले जातात. मात्र या दरानुसार केळीची खरेदी होत नसल्याची स्थिती आहे. सध्या खानदेशात केळीची किमान ७०० ते कमाल १८०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दराने खरेदी सुरू आहे.

चौकट ----
खानदेशातही आवकेत घट
खानदेशातही केळीच्या आवकेत घट झाली आहे. कांदेबाग केळीची काढणी ९५ टक्के पूर्ण झाली आहे. आता उशिराच्या कांदेबाग आणि नवती केळीची काढणी सुरू होईल. सध्या खानदेशात दररोज ७५ ते ८० ट्रक केळीची आवक होत आहे. एका ट्रकची क्षमता १६ टन आहे. पुढील काळात केळीला किमान २५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने दर वाढणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Latest Marathi News Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT