baramati.jpg 
पुणे

बारामती शहरात कडकडीत बंद

मिलिंद संगई

बारामती शहर : ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज बारामती शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
आज सकाळपासूनच लोकांनी आपापले व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवून या कारवाईचा निषेध केला आहे. बारामती शहरातील बंदच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अतिशय कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे . 

बारामतीचे बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची उपस्थिती दिसत आहे. आज बारामतीकरांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होत आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. मात्र औषधांची दुकाने दवाखाने यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू आहेत.

आज ठिकठिकाणी लोक एकत्र जमून या कारवाई संदर्भात चर्चा करताना दिसत आहेत. आचारसंहिता सुरू असल्यामुळे तसेच 144 कलम लागू असल्यामुळे निषेध सभेचे आयोजन रद्द केल्याचे काही ज्येष्ठ मंडळींनी सांगितले. दरम्यान बारामतीतच तणावपूर्ण शांतता जाणवत होती.

दरम्यान, शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून आज बारामती शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी देखील या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र तात्काळ किंवा अति तात्काळ सेवा देण्यासाठी सर्व दवाखाने सज्ज होते. बारामती शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना देखील आज सुट्टी देण्यात आली होती. बंदच्या पार्श्वभूमीवर आज पालकांनी देखील विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT