Baner Bar sakal
पुणे

Pune Night Life : बाहेरून बंद अन् आतून सुरू, पुणे अपघातानंतर बालेवाडी हायस्ट्रीटवरील पब आणि बार सुधारले नाहीत?

बाणेरमधील ‘एजंट जॅक्‍स’ या बारमध्ये रात्री ११ वाजता आम्ही धडकलो. गर्दी तुलनेने कमी होती.

सकाळ वृत्तसेवा

बाणेर, बालेवाडी हाय स्ट्रीट परिसर, लक्ष्मीनगर 11.00 PM

बाणेरमधील ‘एजंट जॅक्‍स’ या बारमध्ये रात्री ११ वाजता आम्ही धडकलो. गर्दी तुलनेने कमी होती. प्रवेशद्वारातच कर्मचाऱ्याने वयाच्या पुराव्याची तपासणी करून किती जण आहात?, मद्य घेणार आहात का? अशी बारीकसारीक माहिती त्यांच्या रजिस्टरमध्ये नोंद करून घेतल्यानंतरच पुढचा मार्ग मोकळा केला. आतमध्ये प्रवेश करताच ‘२५ वर्षांखालील व्यक्तींना तसेच मद्य सेवन परवान्याशिवाय मद्य विक्री केली जात नाही’, या ठसठशीत मराठी फलकाने आमचे स्वागत झाले.

आतमध्ये बसल्यानंतर सगळीकडे नजर गेली. तेव्हा, तिथे बरेच जण आपल्या लहान मुले, कुटुंबासोबत, मित्र मैत्रीणींसोबत तर काही प्रेमी युगुलही ओपन स्पेसमध्ये बसल्याचे दिसले. जेवणाव्यतिरीक्त टेबलावर मद्य, शीतपेये काही दिसली नाहीत. वेटरकडे चौकशी केल्यानंतर त्याने बार १२ वाजता बंद होतो, असे सांगितले. बहुतांशजण जेवणात व्यग्र होते. तिथे मद्य दिले जात नव्हते. मग ठरविल्याप्रमाणे आम्ही बारकडे वळालो.

तिथे पुन्हा एकदा आयडीची विचारणा झाली. तपासणीबाबत विचारणा केल्यावर त्यांनी कल्याणीनगरच्या घटनेचा पाढा वाचला. ‘आधी काही २१ ते २२ पर्यंतच्या तरुणांना मद्य दिले होते, पण आता वय पाहूनच ‘हार्ड ड्रिंक्‍स’ दिली जाते’ असेही त्याने आवर्जून सांगितले. गर्दी असल्याने एकही टेबल रिकामा नव्हता. काही वेळाने एक टेबल आम्हाला मिळाला. गर्दीमध्ये तरुणांची संख्या मोठी होती.

ॲपद्वारे जेवणाची ऑर्डर दिली, त्यामध्ये वयाचा उल्लेख चुकीचा करूनही ॲप खुले झाले. आतमध्ये डिजेचा आवाज असला तरी, गोंधळ मात्र नव्हता. ठिक साडेबारा वाजता डिजे बंद झाला. त्यानंतर शेवटच्या ऑर्डरची घोषणा आणि तत्काळ बिल करण्यास सुरूवातही झाली.

हायस्ट्रीट परिसरात एकला सामसूम

बारमध्ये पावणेबारा वाजता प्रवेश बंद झाला, त्यानंतर ओपन स्पेस रिकामा करण्यात आला. बाहेरून पाहणाऱ्याला बार बंद झाल्याचे भासत असले, तरी आतमध्ये मात्र सर्वकाही सुरळीत सुरू होते. १२.३० वाजता ऑर्डर घेणे बंद झाले. त्यानंतर बाऊन्सरने बार बंद होत असल्याचे सांगून आवराआवर करण्याच्या सूचना दिल्या. पावणेएक वाजता बार रिकामा झाला आणि आम्ही निघालो.

बाहेर पडल्यानंतर हायस्ट्रीट परिसरातील नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई सुरु होती. रस्त्यावरील गर्दी आता ओसरली होती. एरवी गजबजलेले बाणेर, बालेवाडी हायस्ट्रीट परिसरात एक वाजता सामसूम पसरलेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रेनच्या शौचालयात ‘प्रेम’ व्यक्त करणाऱ्यांनो सावधान! आता कुणाचा नंबर किंवा नाव लिहिलंत तर...; रेल्वे प्रशासनाचा थेट इशारा

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग... एसटी पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले होणार! सुविधा कुठे उपलब्ध असणार?

Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

Accident News : हृदयद्रावक घटना! लोहोणेरजवळ मिक्सर गाडीखाली चिरडून आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

Uddhav Thackeray : सरकारने दिलेले पॅकेज ही शेतकऱ्याची थट्टा- उद्धव ठाकरे!

SCROLL FOR NEXT