नसरापूर, ता. १८ : ‘‘मोठी दुरवस्था झालेला व अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या बनेश्वर रस्त्यासाठी ग्रामस्थांची व भाविकांची मागणी होती. यासाठी आपण सर्वांनी मिळून आंदोलन, संघर्ष केला. त्यास यश येऊन आता रस्ता तयार झाला असून, भाविकांची गैरसोय दूर झाल्याचे समाधान आहे,’’ असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
नसरापूर गाव ते बनेश्वर मंदिर या सुमारे सातशे मीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांची मागणी अनेक वर्ष प्रलंबीत होती. याबाबत खासदार सुळे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण देखिल केले होते. याची दखल घेत व आमदार शंकर मांडेकर यांच्या मागणीनुसार तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीएच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत बनेश्वर मंदिर व परिसरासाठी ९ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यातील २ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीमधून रस्त्याचे मजबुतीकरण, संरक्षक भिंत व काँक्रिटीकरणाचे काम केले आहे. त्याचे उद्घाटन श्रावणाच्या पहिल्या सोमवारी सुळे व मांडेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या वेळी जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे, सभापती मनीषा कंक, उपसभापती विशाल कोंडे, भोरचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, संतोष घोरपडे, चंद्रकांत बाठे, रवींद्र बांदल, नसरापूरच्या सरपंच उषा कदम, माजी उपसरपंच नामदेव चव्हाण, संदिप कदम, विक्रम कदम, गणेश खुटवड, यशवंत कदम, मनोज खोपडे, शंकर भुरुक, किरण राऊत, आबासाहेब यादव, हनुमंत कदम, सतीश वाल्हेकर, ज्योती चव्हाण, वसंत चव्हाण आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार मांडेकर म्हणाले, स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रयत्नाने या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला. रस्त्याचे काही अपूर्ण राहिलेले काम तातडीने पूर्ण होणार असून, पुढील दहा वर्षे या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. या रस्त्याबरोबरच वनखात्याच्या हद्दीतील मंदिरापर्यंतच्या राहिलेल्या रस्त्यासाठी कामासाठी वनविभागाने परवानगी दिली आहे. त्या रस्त्याचे काँक्रिटीकरण लवकरच होणार आहे.’’
संरक्षक भिंत बांधली नसल्याची तक्रार
यावेळी ग्रामस्थ ज्ञानेश्वर झोरे, उपसरपंच इरफान मुलाणी, सदस्य गणेश दळवी, सुधीर वाल्हेकर, संदिप कांबळे यांनी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे सांगून निविदेमधील सुमारे तीस मीटरची संरक्षक भिंत बांधली नसल्याची तक्रार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. यावर त्यांनी पीएमआरडीएच्या आयुक्तांशी थेट संपर्क साधून ग्रामस्थांचे म्हणणे सांगितले. त्यावर आयुक्तांनी, याबाबत माहिती घेऊन अपूर्ण राहीलेले सर्व काम दर्जेदार गुणवत्तेने पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.