पुणे

बांगलादेश, फ्रान्सप्रमाणे हिंसाचाराचा कट होता

CD

बांगलादेश, फ्रान्सप्रमाणे
हिंसाचाराचा कट

तरुणांना चिथावणी दिल्याचा रिजिजू यांचा आरोप

नवी दिल्ली, ता. १८ (पीटीआय) : फ्रान्स आणि बांगलादेशप्रमाणेच, भारतामध्येही तरुणांना चिथावणी देऊन रस्त्यांवर हिंसाचार घडवून आणण्याचा कट भारतविरोधी टोळ्या आणि काही राजकीय नेत्यांनी रचला आहे. ही धोकादायक गोष्ट आहे, मात्र भारत म्हणजे बांगलादेश किंवा फ्रान्स नाही, हे चिथावणीखोर विसरले आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे.
मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरपडताळणी (एसआयआर) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात देशभरात आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर, रिजिजू यांच्याकडून विरोधक आणि आंदोलकांना लक्ष्य करण्यात आले आहे. हंगेरी-अमेरिकी राजकीय कार्यकर्ते जॉर्ज सोरोस आणि त्यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशन ही संस्था भारताच्या हितसंबंधांविरोधात सक्रिय असल्याचा आरोप भाजपकडून अनेक वेळा करण्यात आला आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह प्रशांत भूषण, ‘आयसा’ची नेता नेहा बोरा, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्याकडून होणाऱ्या विधानांच्या पार्श्वभूमीवर रिजिजू यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये वरील प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. ते म्हणाले, ‘‘भारतामध्ये केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्तापालट होतो, ‘सोरोस’ यांच्या मार्फत नाही. बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, फ्रान्समध्येही दंगली, जाळपोळ आणि लुटमारीच्या घटना होत आहे. भारतामध्येही अशाच घटना घडवून आणण्याचा कट रचण्यात आल होता. भारतविरोधी टोळ्या आणि काही राजकीय नेत्यांचा यामध्ये हात होता. त्यांच्याकडून तरुणांना चिथावणी देणे आणि हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न होता. मात्र, भारत म्हणजे बांगलादेश किंवा फ्रान्स नाही, याचा त्यांना विसर पडला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूमध्ये गोळीबाराची माहिती; पोलीस तपास सुरू

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

वयाच्या ८८ व्या वर्षीही मर्दानी खेळांचा थरार! शांताबाई पवार यांची प्रेरणादायी कहाणी |Shantabai Pawar

रस्त्याचं काम सुरु असतानाच भरधाव कारची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू; अनेक जण गंभीर

SCROLL FOR NEXT