पुणे

‘बिग कॅट’ आघाडीत बांगलादेशाचाही सहभागी

CD

नवी दिल्ली, ता. २४ (पीटीआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडीत (आयबीसीए) आता बांगलादेशचाही समावेश झाला आहे. सिंह, वाघ, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जॅग्वार आणि प्युमा या मार्जारकुलातील सात मोठ्या प्रजातींचे (बिग कॅट) वास्तव्य असलेल्या देशांचा या आघाडीत समावेश आहे. सध्या ‘आयबीसीए’मध्ये २७ सदस्य देश आणि पाच निरीक्षक देशांचा समावेश आहे.
‘आयबीसीए’ने ‘एक्स’वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘‘या आघाडीत नवीन सदस्य देश म्हणून बांगलादेशचे स्वागत आहे. यामुळे मोठ्या मार्जार प्रजातींच्या आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठीचे आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत होणार आहे. तसेच या प्रजाती आणि त्यांच्या परिसंस्थेचे भावी पिढ्यांसाठी संरक्षण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळ येणार आहे,’’ असे या आघाडीने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ मध्ये ‘आयबीसीए’ची स्थापना केली होती. ही बहुदेशीय आणि बहुसंस्थात्मक आघाडी आहे. मार्जार प्रजातींचे वास्तव्य असलेले देश, संवर्धनात रस असलेले इतर देश, संवर्धन भागीदार, वैज्ञानिक संस्था आणि कॉर्पोरेट समूहांचा यात समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT