पुणे

भारतीय कांद्याला बांगलादेशचे नवे आव्हान

CD

बांगलादेशची श्रीलंकेत
कांदा निर्यातीसाठी चाचपणी

भारतीय कांद्याला नवे आव्हान; अस्थिर धोरणाचा परिणाम

मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक ः भारताच्या कांद्याला जगभरात मागणी असली, तरी अस्थिर निर्यात धोरण आणि वेगाने बदलणारी जागतिक बाजारपेठ यामुळे भारतीय कांदा निर्यात नव्या स्पर्धेच्या वळणावर आली आहे. भारताकडून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करणारा बांगलादेश आता स्वतःच्या कांद्यासाठी परदेशी बाजारपेठा शोधत आहे. श्रीलंकेच्या बाजारपेठेत कांदा आणि बटाटा निर्यातीची शक्यता तपासण्यासाठी बांगलादेश व्यापार पथक पाठविणार आहे. त्यामुळे भारतीय कांद्याच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एका बाजारपेठेत पर्यायी पुरवठादाराची चाचपणी सुरू झाली आहे.
हॉंगकॉंग येथे नुकत्याच झालेल्या अकराव्या बेल्ट अँड रोड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे वाणिज्यमंत्री खंदकार अब्दुल मुक्तादिर आणि श्रीलंकेचे व्यापारमंत्री वसंत समरसिंघे यांच्यात झालेल्या बैठकीत या बाबत चर्चा झाली. बांगलादेशची कृषी उत्पादन क्षमता, श्रीलंकेतील बाजारभाव, मागणी आणि प्रादेशिक पुरवठा साखळीचा अभ्यास करण्यासाठी हे पथक पाठविण्यात येणार आहे.
बांगलादेशमध्ये देशांतर्गत मागणी पूर्ण केल्यानंतर कांदा आणि बटाट्याचा अतिरिक्त साठा उपलब्ध असल्याचे तेथील वाणिज्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे या उत्पादनांसाठी नव्या निर्यात बाजारपेठांचा शोध घेण्यात येत आहे. श्रीलंकेने बांगलादेशकडून कांदा आणि बटाटा आयातीबाबत स्वारस्य व्यक्त केले आहे. या वृत्ताला बांगलादेशातील ‘द डेली स्टार’ या वृत्तसमूहाने दुजोरा दिला आहे.

चौकट ----
श्रीलंकेत भारतीय कांद्याला स्पर्धेची चाहूल
भारताच्या २०२५-२६ मधील कांदा निर्यातीच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, कतार आणि कुवेत यांचा समावेश आहे. या पारंपरिक बाजारपेठांपैकी श्रीलंकेत बांगलादेशी कांद्याचा प्रवेश झाल्यास भारतीय निर्यातदारांसमोर आणखी एक पुरवठादार उभा राहू शकतो. त्याचा परिणाम किंमत, वाहतूक खर्च, दर्जा आणि सातत्यपूर्ण पुरवठ्याच्या स्पर्धेवर होण्याची शक्यता आहे. मात्र, बांगलादेशची प्रत्यक्ष कांदा निर्यात अद्याप सुरू झालेली नसल्याने भारतीय कांद्यावर तातडीचा परिणाम किती होईल, हे स्पष्ट झालेले नाही.

प्रतिक्रिया ----
केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणामुळे कांदा निर्यात अडचणीत आली. प्रमुख कांदा आयातदार बांगलादेश आता निर्यातदार म्हणून पुढे येत आहे. हे पाप सरकारच्या अस्थिर धोरणाचे आहे.
- संतू पाटील झांबरे, ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटना

भारतासाठी आव्हान केवळ अधिक कांदा उत्पादनाचे राहिलेले नाही. सातत्यपूर्ण पुरवठा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खरेदीदारांचा दीर्घकालीन विश्वास टिकविणे ही पुढची कसोटी आहे.बांगलादेशचा श्रीलंकेकडे संभाव्य प्रवेश हा भारतीय कांदा निर्यात व्यवस्थेसाठी बदलत्या जागतिक स्पर्धेची स्पष्ट चाहूल आहे.
- विकास सिंग, उपाध्यक्ष, हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशन ऑफ इंडिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

Manoj Jarange Patil: "विषय फिट बसला!" 58 लाख नोंदींवर जरांगेंचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT