बँक कर्मचाऱ्यांचा
आज देशव्यापी संप
सोलापूर, ता. १० : पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा आणि कामगिरीशी निगडित प्रोत्साहन भत्तामधील भेदभाव दूर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी उद्या (शुक्रवार, ता. ११) देशभरातील बँक कर्मचारी संपावर जात आहेत. या संपाचा थेट परिणाम सोलापूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांच्या सेवांवर होणार आहे. महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी संपाची माहिती दिली.
हा संप केवळ सुट्टीसाठी नाही तर द्विपक्षीय कराराच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष आहे. २०१५ च्या दहाव्या द्विपक्षीय करारात महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी मान्य करण्यात आली होती. अकराव्या करारात उर्वरित दोन शनिवारही सुट्टी देण्याची शिफारस बँक व्यवस्थापनांनी मान्य करून केंद्र सरकारकडे पाठवली होती. इंडियन बँक्स असोसिएशन आणि संघटनांनी त्यावर स्वाक्षरीही केली आहे. मात्र सरकार अंमलबजावणी रोखून धरत आहे.
द्विपक्षीय करारानुसार कर्मचाऱ्यांसाठी ठरलेली योजना न राबवता उच्च व्यवस्थापनासाठी स्वतंत्र, अधिक लाभदायक योजना लागू केली जात आहे. हा सामूहिक सौदेबाजीला बगल देण्याचा प्रकार आहे, असा आरोप संघटनांचा आहे.कर्मचाऱ्यांचा संयम अमर्याद नाही. ११ सप्टेंबरनंतरही मागण्या मान्य न झाल्यास २८, २९, ३० सप्टेंबरला तीन दिवसांचा संप आणि ऑक्टोबरमध्ये बेमुदत संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.