e vehical sakal
पुणे

ईव्हीच्या कर्जाबाबत बँका व फायनान्स संस्था सकारात्मक

बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व फायनान्स संस्थांची भूमिका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जनजागृती, वाहनांच्या योग्य किमती आणि ई वाहनांसाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या तर ईव्हीचा वापर नक्कीच वाढले. या वाहनांना वित्तपुरवठा करण्याबाबत बँका व फायनान्स संस्था सकारात्मक असल्याची माहिती बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व फायनान्स संस्थांनी मंगळवारी (ता. ५) दिली.

‘पुणे पर्यायी इंधन परिषदे’त (पुणे एएफसी) ‘भारताच्या ई-मोबिलिटी ट्रान्झिशनला वित्तपुरवठा’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. ‘युनियन बँक ऑफ इंडिया’चे मुख्य महाव्यवस्थापक के. भास्कर राव, ‘आरएमआय’चे प्राचार्य रायन लेमेल, ‘रेव्हफिन’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर अग्रवाल, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे कमर्शिअल क्लायंट ग्रुपचे महाव्यवस्थापक शेषराम वर्मा, ‘अॅक्सिस बँके’चे ग्रुप एक्झिक्युटिव्ह आणि रिटेल लेंडिंगचे प्रमुख सुमीत बाली आणि ‘एचडीएफसी’ बँकेच्या वाहन कर्ज विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष विकास अरोरा या चर्चासत्रात सहभागी झाले होते. आरएमआय इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक अक्षिमा घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

अरोरा म्हणाले, ‘‘इव्ही ही बँकांसाठी एक संधी आहे. खातेदार किंवा ग्राहक कोणते वाहन घेत आहे यापेक्षा आम्ही त्याचे प्रोफाइल बघून कर्ज देतो. त्यामुळे इंधनाचा कर्जावर फारसा फरक पडत नाही.’’ अग्रवाल म्हणाले, ‘‘ईव्हीसाठी पैसे उभे करणे अवघड काम होते. कारण ईव्हीसाठी गुंतवणूक करणारे खुपच कमी होते. आता काहीसा फरक पडला आहे. वाहन खरेदी आणि कर्जाच्या वाटपाचे डिजिटलायझेशन झाले आहे.’’

लेमेल म्हणाले, ‘‘ आपल्याला आर्थिकदृष्ट्या काही नवीन करायची गरज नाही. मूळ प्रश्न हा आहे की, आपण कोणता फायनान्स वापरणार आहोत. यात बॅंक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.’’ बाली म्हणाले, ‘‘ इंधनावरील कर कमी केल्याचा त्याचा फायदा पर्यावरणाला होर्इल. बॅटरीची विल्हेवाट कशी लावायची याबाबत धोरण हवे. योग्य विल्हेवाट न लावल्यास आणखी प्रदूषण होत असल्याचे घडले आहे.’’

इव्ही केवळ शहरांपुरती नको :

प्रदूषण हे केवळ शहरांपुरते मर्यादित नाही. त्यामुळे ईव्ही देखील शहरात राहू नये. ग्रामीण भागात देखील या वाहनांचा वापर वाढला पाहिजे. आपल्याकडे नैसर्गिक पर्याय देखील आहेत. त्याचा देखील वापर आपण करावा, असे आवाहन वर्मा यांनी केले. तर राव यांनी पायाभूत सुविधांवर मत मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: विजेच्या धक्क्याने मुलगा जखमी

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT