पुणे

बॅंकांची कर्जवसुली थांबवली तर बॅंका तोट्यात जातील

सकाळवृत्तसेवा

पुणे - बॅंकांची कर्जवसुली थांबवली तर अनुत्पादक कर्जाचे प्रमाण वाढून बॅंका तोट्यात जातील. याचा बॅंकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होणार असून, विभागीय आयुक्तांनी कर्जवसुलीसाठी सक्तीने उपाययोजना न करण्याबाबत दिलेले पत्र स्थगित करावे, अशी मागणी पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशनने केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना कालावधीत बॅंकांनी कर्जवसुलीसाठी सक्तीच्या उपायोजना करू नयेत, तसेच कर्जदारांचा शारीरिक आणि मानसिक छळ करू नये, असे परिपत्रक विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नुकतेच जारी केले आहे. या संदर्भात पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशनने विभागीय आयुक्‍तांना पत्र लिहिले आहे. 

पुण्यातील बॅंकांनी कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टर आणि वैद्यकीय उपकरणांसाठी १६ लाखांहून अधिक निधी जमा केला. नागरी बॅंकांच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांनी गरजू कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वितरण केले. पुण्यातील बॅंकांनी एक कोटी ८६ लाखांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करून आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले आहे.

रिझर्व्ह बॅंकेने एक मार्च २०२० ला कर्ज खात्यांना तीन महिन्यांचा मोरेटोरियम दिला होता. तो आणखी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला. जास्त काळ सवलत देणे बॅंकांच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने ३१ ऑगस्टनंतर मोरेटोरियमचा कालावधी वाढवला नाही. कर्जवसुलीबाबत कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. बॅंकांनी कर्ज वसुली थांबविल्यास बॅंका तोट्यात जातील. काही थकबाकीदार कर्जदार सवलतीचा गैरफायदा घेत आहेत. आपल्या परिपत्रकाचा बागुलबुवा करीत आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक आणि सहकार खात्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असे या पत्रात नमूद केले आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT