पुणे

हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणारा सोनंदचा तरुण सांगोल्यात ताब्यात

CD

एक वर्ष जिल्हाबंदी;
तरी सांगोल्यात ‘एंट्री’!
सोनंदचा तरुण सांगोला पोलिसांच्या ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. १२ : उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला अतुल रामराव ऊर्फ रामचंद्र पाटील (वय ३६, रा. सोनंद, ता. सांगोला) हा हद्दपार आदेशाचा भंग करून सांगोला शहरात आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवेढा विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी बी. आर. माळी यांच्या न्यायालयाने महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये अतुल पाटील याला सोलापूर जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. या आदेशाची २४ ऑगस्ट रोजी त्याला बजावणी करण्यात आली होती. शनिवारी (ता. १२) पोलिसांचे पथक सांगोला शहरात पेट्रोलिंग करीत असताना अतुल पाटील हा एखतपूर रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शोध घेतला असता नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या निवास स्थानाजवळील रस्त्यावर तो आढळून आला. पंचांसमक्ष चौकशी करून त्याला ताब्यात घेण्यात आले.
हद्दपार असतानाही सांगोल्यात येण्याबाबत तसेच पूर्वपरवानगी घेतली आहे का, याची विचारणा केली असता त्याने समाधानकारक माहिती दिली नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक गुरव, पोलिस नाईक गवळी, तसेच पोलिस कर्मचारी काळे, कुंभार व पठाण यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश! शेंदूरवाड्यात १० केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर सुरू; शेतकऱ्यांना आता आठ तास वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा

Rafale Marine : भारतीय नौदलाच्या हवाई सामर्थ्यात भर! आयएनएस विक्रांतवर राफेल मरीनचे यशस्वी लँडिंग

Marathi News Live Updates : माजी मंत्री तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्याकडून रविराज साबळे यांना घरात घुसून जिवे मारण्याची धमकी; दिवाळी किट वाटपावरून वाद!

RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

Amit Shah: संसदेत होणार 'आर-पार'ची लढाई! 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं राहुल गांधींसह अखिलेश यादवांना आव्हान

SCROLL FOR NEXT