banyan tree fell Pune-Mumbai road traffic jam road closed for 2 hours  Sakal
पुणे

Pune News : पुणे-मुंबई मार्गावर वडाचे झाड कोसळून वाहतूक ठप्प

सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहनांची रहदारी असल्याने दुतर्फा वाहतूक कोंडी झाली

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन : पुणे-मुंबई महामार्गावरील बगीचा समोर असलेला अंदाजे ७०-८० वर्षे जुने वडाचा महाकाय वृक्ष सोमवारी (ता.१४) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास अचानक मुळासकट उन्मळून कोसळल्याने दोन तासांहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी होऊन वाचला.दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार नेमका फांद्यांच्या मधोमध असलेल्या जागेत सापडल्याने वाचला. एका कारचे किरकोळ नुकसान झाले मात्र,मोठा अनर्थ टळला.

लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहनांची रहदारी असल्याने दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल आणि सहकाऱ्यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीने कटरच्या सहाय्याने झाडाच्या काही फांद्या कापून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

मात्र,झाड आरपार रस्त्यावर पडल्याने मुंबईकडून पुण्याकडे जाणारी केवळ एकच लेन चालू होती .त्यामुळे मुंबईकडून येणारी वाहतूक सेवारस्त्याने लिंबफाटामार्गे पुण्याकडे तर पुण्याकडून येणारी वाहतूक विरुद्ध दिशेने मुंबईकडे वळवून काहीशी रहदारी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

तोपर्यंत लांबपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.त्यानंतर एक दिड तासात आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी झाडाची पुर्ण छाटणी करुन,जेसीबीच्या सहाय्याने फांद्या हटवून रस्ता सुरळीत केला.पुणे-मुंबई महामार्गावरील जीर्ण झाडांमुळे संभाव्य अपघातांचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT