सदाशिव पेठ - शनिपार मंडळाने सत्यम-शिवम-सुंदरम हा आगळावेगळा व भव्य देखावा साकारला आहे.  तो पाहण्यासाठी मंगळवारी झालेली गर्दी.
सदाशिव पेठ - शनिपार मंडळाने सत्यम-शिवम-सुंदरम हा आगळावेगळा व भव्य देखावा साकारला आहे. तो पाहण्यासाठी मंगळवारी झालेली गर्दी. 
पुणे

#BappaMorya पेठा गजबजल्या

सकाळवृत्तसेवा

पुणे - ढोल-ताशाच्या गजरात, श्रींची सामूहिक आरती करीत, विविध क्षेत्रांतील नेतेमंडळींना आमंत्रणे देत अनेक मंडळांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत असून, मध्यवर्ती पेठांतील प्रमुख मंडळांचे देखावे पाहण्याचा आनंद उत्सवाच्या सहाव्या दिवशी अनेक पुणेकरांसह परदेशी नागरिकांनीही घेतला. गणेशभक्तांनी पेठांही गजबजून गेल्या होत्या. 

पुण्यनगरीचा गणेशोत्सव पाहायला आलेल्या परदेशी नागरिकांनी दिवसभर विविध पेठांतील मंडळांना भेटी दिल्या. तसेच, बाप्पांचा देखावा पाहिला. रात्री उशिरापर्यंत गणेशभक्त देखावे पाहत होते. त्यामुळे संपूर्ण शहरातच रात्री उशिरापर्यंत उत्साहाचे वातावरण जाणवत होते. देखावे पाहायला नागरिक घराबाहेर पडल्याने मध्यवर्ती भागात वाहतुकीची कोंडी जाणवत होती. मात्र, त्या कोंडीचा त्रास वाहनचालकांच्या चेहऱ्यावर नव्हता. अनेक मंडळांचे देखावे पूर्ण झाले असल्याने, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारीदेखील मध्यवर्ती भागात गणेशभक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT