NCP Ajit Pawar  Sakal
पुणे

Pune : अजित पवारांनी 'त्या' मुद्यांवरून खंत व्यक्त केली

गेल्या काही दिवसात अजित पवार यांच्या विषयी माध्यमातुन आलेल्या बातम्या विषयी बोलताना अजित पवार यांनी या सर्व प्रकरणात आपली बदनामी झाल्याची खंत बोलून दाखवली. नॉट रिचेबल हा प्रकार अवघड आहे असे सांगत अजित पवार यांच्यावर एवढं प्रेम का उतू चाललय हेच समजत नाही, असे ते म्हणाले.

मिलिंद संगई, बारामती.

Baramati, Ajit Pawar - माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही, या आपल्या विधानाचा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज बारामतीत बोलताना पुनरुच्चार केला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. बारामतीच्या विकासासाठी मी कायमस्वरूपी कटिबद्ध आहे, माझ्याबाबत विनाकारण संशय निर्माण करणारे, अफवा पसरवणारे वातावरण तयार केले जात असून माझी जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे.

अशा बातम्यांकडे बारामतीकरांनी लक्ष देऊ नये, अजित पवार आणि बारामती हे अतूट समीकरण असून मी कायम बारामतीच्या विकासासाठी वचनबद्ध असेल अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी आज दिली.

गेल्या काही दिवसात अजित पवार यांच्या विषयी माध्यमातुन आलेल्या बातम्या विषयी बोलताना अजित पवार यांनी या सर्व प्रकरणात आपली बदनामी झाल्याची खंत बोलून दाखवली. नॉट रिचेबल हा प्रकार अवघड आहे असे सांगत अजित पवार यांच्यावर एवढं प्रेम का उतू चाललय हेच समजत नाही, असे ते म्हणाले.

विरोधकांच्या बाबतीत मी सॉफ्ट असतो आणि टीका करीत नाही हा आरोप देखील मला मान्य नाही असे सांगत पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सभ्य व सुसंस्कृतपणा असून त्या सभ्यतेची पातळी मी कधीही ओलांडणार नाही

संसदीय आयुधांचा वापर करून विरोधक व सरकारला धारेवर धरण्याचे काम अधिवेशनाच्या काळात मी केले आहे. मात्र एकमेकांवर खुर्च्या भिरकाविणे, अंगावर धावून जाणे, अयोग्य शब्दांचा वापर करणे, विधिमंडळात कागदे भिरकावणे याला तीव्र विरोध म्हणत असतील तर असा विरोध मला कदापीही मान्य होणार नाही.

आपल्याबद्दल आलेल्या बातम्यां बाबत बोलताना एखाद्याच्या मागे किती हात धुऊन लागावे याला पण काही मर्यादा असतात, त्या मर्यादा पाळल्या गेल्या नाहीत, अशी नाराजीही त्यांनी बोलून दाखविली. काहीही झाले की अजित पवार नॉट रिचेबल आहे

अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमातून येतात आणि त्याचा विपर्यास केला जातो, मात्र बारामतीकरांना मी सांगू इच्छितो की शेवटच्या क्षणापर्यंत मी बारामतीच्या विकासासाठी कार्यरत असेल.

ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा मी स्वतः कार्यकर्त्यांच्या जीवावरच मोठे झालेलो आहे, त्यामुळे आमच्या राजकीय प्रवासात कार्यकर्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, अशी अपेक्षा देखील अजित पवार यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-ठाणे मेट्रोसह 'या' ९ मार्गांना सुपरस्पीड मिळणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय; कनेक्टिव्हिटीचं नवं युग सुरू होणार

Apple on Sanchar Saathi App : ‘अ‍ॅपल’ने सरकारच्या ‘Sanchar Saathi APP’ 'प्रीलोड'बाबत अखेर स्पष्ट केली भूमिका!

Gautam Gambhir : रवी शास्त्री यांनी साधला गौतम गंभीरवर निशाणा; म्हणाले, त्याचा बचाव करणार नाही, कारण १०० टक्के चूक...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगरात बोगस मतदार, आमदार चंद्रकांत पाटील यांचा संताप

Voting Machine Failure : अंबड निवडणुकीत मशिन दीड तास बंद; दिव्यांग–वृद्ध ताटकळत; मतदारांमध्ये नाराजी!

SCROLL FOR NEXT