Ajit pawar sakal
पुणे

बारामती बाजार समिती कापसाची खरेदी विक्री सुरु करणार

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 19 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

बारामती : पुढील महिन्यापासून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची खरेदी विक्री सुरु केली जाणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 19 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. प्रशासक व सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे, बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, बारामतीत कापसाची खरेदी विक्री गेल्या 1981 पासून बंद होती, आता या पुढील काळात ही खरेदी विक्री सुरु होणार असून त्याचा फायदा कापूस विक्रेते व व्यापारी यांनाही होईल. आसपासच्या जिल्ह्यातील कापूस उत्पादकांसाठीही ही संधी असेल.

दरम्यान भविष्यातील गरज विचारात घेता लवकरच दूध संघ, खरेदी विक्री संघ व बाजार समितीच्या पेट्रोलपंपांना जोडून इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्सही सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. सीएनजी प्रमाणे या चार्जिंग स्टेशन्सलाही वाहनचालकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गेल्या काळात खासदार निधी, राज्य शासन व इतर माध्यमातून बाजार समितीला जवळपास 65 कोटी रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी मिळाला, समितीच्या स्थापनेपासून हा सर्वाधिक निधी असल्याचा अभिमान आपल्याला वाटतो, असे त्यांनी नमूद केले.दरम्यान बाजार समितीच्या कामकाजाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे 26 एकर जागा खरेदीचा प्रस्ताव दाखल केल्याचीही माहिती त्यांनी दिली.

रयत भवन हे मंगल कार्यालय पाडून त्या जागी व्यापारी संकुल उभारल्यास संस्थेला कायम स्वरुपी उत्पन्नाचे साधन प्राप्त होईल व या परिसराचा विकासही होईल, त्या मुळे संस्थेलाही त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Money Lending Law: महाराष्ट्रातील सावकार अडचणीत येणार! कायद्यात मोठा बदल होणार; महाराष्ट्र सरकार महत्त्वाचं पाऊल उचलणार

T20 World Cup 2026: पाकिस्तानी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वल अन् विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अमेरिकन टॉपर! भारतीय कुठेत?

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

Virar News : भाजपला धक्का! भाजप महिला मोर्चा प्रमुख ॲड. साधना धुरी यांचा बविआत प्रवेश

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेत नमाज पठण झाल्याने उफाळला वाद

SCROLL FOR NEXT