ncpbjp 
पुणे

बारामतीत भाजप चमत्कार घडविणार की राष्ट्रवादी इतिहास?

मिलिंद संगई

बारामती शहर (पुणे) : बारामती विधानसभा मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात असले, तरी प्रमुख लढत ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार व भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यात होणार आहे. पवार हे आपल्या विजयाची परंपरा यंदा राखणार, की पडळकर काही चमत्कार घडवून दाखविणार, याबाबत उत्सुकता आहे. 

पडळकर यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट बारामती विधानसभा मतदारसंघात पवार यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्यास पाठविले. त्यांना प्रचाराला अतिशय कमी कालावधी मिळाला. मात्र, तरीही त्यांनी बारामती तालुक्‍यातील सर्व गावे व शहरातील सर्व प्रभागांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. भाजपसह मित्रपक्षांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्या मागे ताकद लावली आहे. 

दुसरीकडे, राष्ट्रवादीने आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे कार्यकर्त्यांच्या जिवावरच ही निवडणूक लढविण्याचे धोरण आखले आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि पवार कुटुंबीयांतील सुनेत्रा पवार, जय पवार, शर्मिला पवार हे बारामती तालुक्‍यात प्रचारासाठी फिरत आहेत. 
बारामतीत यंदाही नेहमीच्या निवडणुकीप्रमाणेच घराणेशाहीसह जिरायत भागातील पाण्याचा प्रश्‍न, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

बारामतीमध्ये अजित पवार यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपने केला खरा; मात्र अजित पवार यांनी तो फारसा मनावर घेतला नाही. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर थेट शेवटच्या सांगता सभेला ते बारामतीत प्रचाराला येणार आहेत. आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकार परिषदेतच त्यांनी आपण एक लाखाहून जास्त मताधिक्‍याने विजयी होऊ, असा विश्‍वास व्यक्त केला होता. पडळकर तुलनेने नवीन उमेदवार असल्याने यंदा अजित पवार यांचे मताधिक्‍य सर्वाधिक राहील, असा राष्ट्रवादीला विश्‍वास वाटतो. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार यांनीदेखील अजित पवार यांना आपला पाठिंबा दिला आहे. 

विधानसभेची निवडणूक असली, तरी बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा निवडणुकीचा उत्साह अजिबात जाणवत नाही, हेही तितकेच खरे आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी, बारामती विधानसभा जिंकणे हा आशावाद ठरेल, असे निवडणुकीपूर्वी नमूद केले होते. त्यामुळे बारामतीत मतदान किती होते व मतदानाची टक्केवारी किती वाढते, हा या ठिकाणी खरा औत्सुक्‍याचा विषय आहे. 

भाजपने लावली ताकद 
भाजपने ताकद दिल्यामुळे पडळकर यांना अधिक मताधिक्‍य मिळेल, असा विश्‍वास भाजपला वाटत आहे. बारामती मतदारसंघाचा इतिहास पाहता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत सभा घेऊनही अजित पवार यांचा पराभव तर दूरच; मात्र त्यांचे मताधिक्‍य कमी करणेही भाजपला शक्‍य झाले नाही. तरीही, भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांनीही बारामतीत सभांचे आयोजन केलेले आहे. बारामती विधानसभा व बारामती लोकसभा या दोन्ही निवडणुका जिंकण्याचे टार्गेट डोळ्यांसमोर ठेवूनच फडणवीस व पाटील यांची वाटचाल सुरू आहे. त्यादृष्टीने त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र बारामतीत दिसते आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayan Sai Divorce : आसारामबापूच्या मुलाचा अखेर घटस्फोट ! १८ वर्षांचे नाते संपुष्टात; पत्नीला द्यावी लागणार 'इतक्या' कोटींची पोटगी

अपयशी प्रेमीयुगलांना सावरतोय ‘एआय’; ‘मूव्ह-ऑन’ करण्यासाठी दुखावलेल्या भावनांवर चॅटबॉक्सची फुंकर

Orphan Rescue Story: जन्मदात्यांनी सोडले, ‘माउली’ने लेकरांना स्वीकारले; सोनी-चंदूचा संघर्ष, वनीकरणात आढळली होती बेवारस मुले!

Latest Marathi News Live Update: तुळजापुरात एका कार्यक्रमात जेवलेल्या १९ महिलांसह ३ पुरुष, २ लहान मुलांना विषबाधा

MLA Satyajit Tambe : पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा उत्तर पुणे जिल्हा तसेच संगमनेर, नाशिकसाठी महत्त्वाचा

SCROLL FOR NEXT