Touch Panel Sakal
पुणे

Baramati News : बारामतीत फळ्याची जागा घेतली स्मार्ट इंटरअँक्टिव्ह टच पॅनेलने

वर्ग मग तो शालेय असो की महाविद्यालयीन... सर्वप्रथम नजरेसमोर येतो तो फळा व खडू..... प्रत्येकाच्या जीवनात वर्गातील फळा व खडू हा अविभाज्य अंग होता...

मिलिंद संगई

बारामती - वर्ग मग तो शालेय असो की महाविद्यालयीन... सर्वप्रथम नजरेसमोर येतो तो फळा व खडू..... प्रत्येकाच्या जीवनात वर्गातील फळा व खडू हा अविभाज्य अंग होता... काळ बदलला तसे तंत्रज्ञानही बदलले व आता हळुहळू फळयाची जागा स्मार्ट इंटरअँक्टिव्ह पॅनेल घेतली आहे.

बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील सर्व 27 वर्गातील फळ्याची जागा स्मार्ट इंटरअँक्टिव्ह टच टच पॅनेलने घेतली आहे. एखादया अभियांत्रिकी महाविद्यालयात अशा पध्दतीने विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान देण्याची ही देशातील पहिली सुरवात म्हणावी लागेल.

सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजिज पुणे यांच्या सहकार्याने विद्या प्रतिष्ठानने बदलत्या काळाशी सुसंगत राहत हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते व सिमुसॉफ्ट कंपनीचे कार्यकारी संचालक सुनील चोरे , आयबीएमचे हरि सुब्रम्हण्यम, विकरुददीन सुरकी, रामनाथ शानबाग, श्रीनिवास रामानुजम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस. बिचकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रणालीचे मंगळवारी (ता. 18) उदघाटन झाले.

संगणक प्रणालीशी जोडलेल्या 86 इंचाच्या या भव्य सेन्सेस इंटरअँक्टिव्ह टच पॅनेलच्या मदतीने शिक्षक मुलांना हव्या त्या बाबी सहजतेने शिकवू शकतात. इंजिनची माहिती दयायची असेल तर पॅनेलवरून यू टयूबवर जात मुलांना त्याचे व्हिडीओ दाखविता येतात, समग्र माहिती हवी असल्यास गुगलवरुन ती घेता येते, त्याचे थ्रीडी इमेज कसे दिसतील यासह अगदी प्रात्यक्षिकही या मुळे शक्य होणार आहे.

या पॅनेलवर ज्या गोष्टी शिक्षक शिकवतील त्या थेट मुलांच्या मोबाईलवरही पाठविता येतील, त्याच्या नोटस मुलांकडे सेव्ह राहतील. पुन्हा संदर्भ लागला तरी सहजतेने त्या दिवशीची फाईल उघडून पुन्हा त्यावर चर्चा करता येईल.

विंडोज प्रणालीसह सह अंतर्भूत असलेल्या यातील अद्ययावत संगणकामुळे या इंटरअक्टिव्ह पॅनेलच्या माध्यमातून वर्गात शिकवित असलेल्या विषयाशी अनुषंगिक सर्वच बाबी मुलांपुढे सहजतेने शिक्षक ठेवू शकतील. ख-या अर्थाने हा वर्ग या पुढील काळात स्मार्ट क्लासरुम म्हणून ओळखला जाणार आहे.

अशा प्रकारे स्मार्ट क्लासरुम संपूर्ण महाविद्यालयातील प्रत्येक वर्गात सुरु करणारे विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे देशातील पहिलेच अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे.

बदलत्या काळानुसार ग्रामीण भागातील महाविद्यालय देखील कात टाकत आहेत, हेच या वरुन सिध्द झाले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान बारामती पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत आले आहे, त्याचा थेट फायदा त्यांना होणार आहे.

शिक्षणाचे आकलन होणार अजून सोपे.....

एखादा विषय समजून सांगण्यासाठी आता शिक्षकांना प्रत्येकवेळी लॅपटॉप वर्गात नेऊन तो प्रोजेक्टरला जोडून वायरिंग करावे लागणार नाही. अभियांत्रिकीच्या क्लिष्ट संकल्पना इंटरॅक्टिव्ह टच डिस्प्ले यंत्रणेद्वारे ऑडिओ व्हिडीओ आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स च्या माध्यमातून आता थेट वर्गातच 86 इंची पॅनलवर विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार आहेत.

स्मार्ट क्लासरूम ह्या संकल्पनेच्या एक पाऊल पुढे जात ह्या अत्याधुनिक यंत्रणेत वेब कॉन्फरन्स, वेगवेगळ्या लॅबमधील , वेगवेगळ्या सिम्युलेशन सॉफ्टवेअर्सची उपलब्धता कुठल्याही क्लासरूम मध्ये करून घेता येईल.

- सुनील चोरे, कार्यकारी संचालक, सिमुसॉफ्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT