बारामती, ता. १३ : घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या जयपाल लखन पवार (वय ४१, रा. निरावाघज फाटा, ता. बारामती) या महिलेला पोलिसांनी बारामती बसस्थानक परिसरातून अटक केली. तिच्याकडून चार तोळे सोन्याचे दागिने म्हणजेच सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बारामती तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हा घडलेले ठिकाण, वेळ आणि चोरीची पद्धत यांचा अभ्यास करून तपास सुरू असताना, संबंधित महिला बारामती बसस्थानकातून साताऱ्याला जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि बारामती तालुका पोलिस ठाण्यातील महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्याकडून चार तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक फौजदार सुधीर वाळुंज, बाळासाहेब कारंडे, उपनिरीक्षक भोसले यांच्यासह पोलिस अंमलदार शिवाजी निकम, सचिन होळकर, स्वप्नील अहिवळे, पोपट नाळे, किशोर तेलंग, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, गणेश डेर, रहिस मुलानी आणि महिला पोलिस हवालदार देवकाते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.