पुणे

बारामतीत एसटी वाहकाला मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा

CD

बारामती, ता. २४ : प्रवासाचे तिकीट सांगवीपर्यंतच असल्याने पुढील प्रवासासाठी नियमानुसार तिकीट काढण्यास सांगितल्याचा राग मनात धरून तीन तरुणांनी एसटी बस अडवून वाहकाला मारहाण केल्याची घटना बारामतीतील तुपे पेट्रोलपंपाजवळ रविवारी (ता. २३) सायंकाळी घडली. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एसटी महामंडळाचे वाहक रामचंद्र दादा जाधव यांनी फिर्याद दिली आहे. जाधव हे बस (क्र. एमएच १४ बीटी ४४२५) वर बारामती-फलटण मार्गावर वाहक म्हणून कर्तव्य बजावत होते. फलटणहून बारामतीकडे येत असताना सांगवी येथे बसमधील काही प्रवाशांचे तिकीट सांगवीपर्यंतच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पुढील प्रवासासाठी नियमानुसार तिकीट काढण्यास सांगितल्याने संबंधित व्यक्तींनी नाराजी व्यक्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी तुपे पेट्रोलपंपाजवळ तीन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आल्या. त्यांनी दुचाकी एसटी बससमोर आडवी लावून बस थांबवून जाधव यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बसचालक व इतर प्रवासी मदतीसाठी पुढे येत असल्याचे पाहून तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, त्यांची दुचाकी (क्र.एमएच ११ सीपी ७३९९) घटनास्थळीच राहिल्याने ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

Wai Tree Transplantation: कुऱ्हाड थांबली, वृक्षांना मिळाले नवजीवन! वाईत ४० वर्षे जुन्या १९ वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वी

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

SCROLL FOR NEXT