Ajit Pawar esakal
पुणे

बारामतीत कॅन्सर हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न मार्गी

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशेजारी असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या कार्यशाळेची जागा नियोजित कॅन्सर हॉस्पिटलसाठी संपादीत करण्याचा अजित पवार यांचा मानस आहे.

मिलिंद संगई

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशेजारी असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या कार्यशाळेची जागा नियोजित कॅन्सर हॉस्पिटलसाठी संपादीत करण्याचा अजित पवार यांचा मानस आहे.

बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यादृष्टीने काहीसा संवेदनशील व महत्वाकांक्षी असलेल्या नियोजित कॅन्सर हॉस्पिटलच्या (Cancer Hospital) जागेबाबत (Place) आज मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस राज्य परिवहन मंडळ, एमआयडीसी, वैद्यकीय शिक्षण व अर्थ विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बारामतीत कॅन्सर हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशेजारी असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या कार्यशाळेची जागा नियोजित कॅन्सर हॉस्पिटलसाठी संपादीत करण्याचा अजित पवार यांचा मानस आहे. त्या दृष्टीने आजच्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली.

एसटी कार्यशाळेसाठी एमआयडीसीमध्ये तितकीच जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असून वैद्यकीय महाविद्यालयाशेजारील सध्याची कार्यशाळेची जागा कॅन्सर हॉस्पिटलसाठी हस्तांतरीत करण्याबाबतही चर्चा झाली. अजित पवार यांनी सर्व संबंधित वरिष्ठ अधिका-यांना या बाबत आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या शिवाय एमआयडीसीमध्ये क्रीडा संकुल करण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली.

या बाबत संबंधितांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या. त्या नुसार आता कॅन्सर हॉस्पिटलसाठी जागा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ही जागा उपलब्ध झाल्यानंतर येथे हॉस्पिटल उभारणीसाठी प्रकल्प अहवाल तयार होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या हॉस्पिटल उभारणीसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनासोबत अगोदरच चर्चा सुरु केली असून येत्या काही दिवसात याचा नेमका आराखडा तयार होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्राला बारामती मध्यवर्ती...

नगर, सातारा, सोलापूर, पुणे व कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने बारामती मध्यवर्ती असून बारामतीतील कॅन्सर हॉस्पिटल या सर्व जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती असेल, असे अजित पवार यांनी या बैठकीत नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT