Sharad Pawar Sakal
पुणे

Baramati News : बारामतीचे सेंटर ऑफ एक्सलेन्स पथदर्शी प्रकल्प म्हणून उदयास येईल - शरद पवार

देशातील पहिला अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलेन्स इन डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अँड रोबोटिक ऑटोमेशन हा प्रकल्प आगामी काळात पथदर्शी प्रकल्प म्हणून उदयास येईल.

मिलिंद संगई

बारामती - देशातील पहिला अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलेन्स इन डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अँड रोबोटिक ऑटोमेशन हा प्रकल्प आगामी काळात पथदर्शी प्रकल्प म्हणून उदयास येईल, सक्षम व दूरदृष्टी असलेली नवीन पिढी तयार करण्याचे आव्हान बदलत्या तंत्रज्ञानाद्वारे पेलले जाईल, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

विद्या प्रतिष्ठान सेंटर ऑफ एक्सलेन्स इन डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अँड रोबोटिक ऑटोमेशनचा प्रारंभ बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे झाला असून या सेंटरचे औपचारिक उदघाटन शनिवारी (ता. 23) शरद पवार व फिनोलेक्स जे पॉवर सिस्टिम्सचे अध्यक्ष दीपक छाब्रिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या प्रसंगी शरद पवार बोलत होते.

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही.प्रभुणे, सचिव अँड. नीलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त विठ्ठल मणीयार, किरण गुजर, डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, एसीडीसीचे प्रमुख के.सी.बोरा, सिम्युसॉफ्टचे प्रमुख सुनील चोरे, रजिस्ट्रार श्रीश कंभोज उपस्थित होते.

सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने या सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. फिनोलेक्स केबल कंपनीने या सेंटरच्या उभारणीसाठी योगदान दिले आहे.

शरद पवार म्हणाले, आगामी सहा महिन्यात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची इमारत बारामतीत साकारणार असून भविष्यात कृषीसह इतरही विषयांवर येथे संशोधन होईल. विद्या प्रतिष्ठान व अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या दोन्ही संस्थांची उंची वाढत असून नवीन तंत्रज्ञान बारामतीत येताना त्यात विद्यार्थी सहभागी होत आहेत, याचा आनंद आहे.

प्रतापराव पवार म्हणाले, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड, आयबीएम या सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था बारामतीत येतात, स्मार्ट एज्युकेशनच्या दिशेने आपण पावले टाकतो आणि जागतिक तंत्रज्ञानासोबत बारामतीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळते आहे. शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे बारामतीत आज या बाबी साध्य होत आहेत, याची जाणीव आपण ठेवायला हवी. ही सुरवात आहे, अजून खूप काही साध्य करायचे असून सातत्याने नव्याचा शोध येथे घेतला जाईल.

दीपक छाब्रिया यांनी शिक्षणाच्या माध्यमातून बदल घडतो, त्या मुळे नवीन संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याचा हा प्रयत्न प्रशंसनीय असून जागतिक आव्हानांना भारतीय मुले यशस्वीपणे तोंड देतील, असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. अजित जावकर यांनीही आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे नोक-या जाणार नाहीत तर त्याचा वापर करुन आपले जीवन अधिक उंचावता येईल, असे नमूद केले. सिम्युसॉफ्टचे सुनील चोरे यांनी बारामतीत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी या सेंटरमुळे मिळतील असे सांगत, उद्योगांनाही नवीन डिझाईन्स तयार करण्यासोबत इतर मदतीची ग्वाही दिली. डॉ. आर.एस.बिचकर यांनी प्रास्ताविक केले, अँड. ए.व्ही. प्रभुणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

SCROLL FOR NEXT