चकोर वाघोलीकर Sakal
पुणे

बारामतीचा 'अवलिया' मुक्या जीवांसाठी करतोय पाण्याची सोय

गेल्या सहा वर्षांपासून बारामतीचे उद्योजक चकोर वाघोलीकर या कामात आपणहून पुढाकार घेतात.

मिलिंद संगई, बारामती

बारामती : दरवर्षी उन्हाळा सुरु झाला की बारामतीतील एका अवलियाची लगबग सुरु होते ती जंगलातील पाठवठ्यांमध्ये पाणी सोडण्याची गेल्या सहा वर्षांपासून बारामतीचे उद्योजक चकोर वाघोलीकर या कामात आपणहून पुढाकार घेतात.

कोणालाही कसलीही मदत न मागता स्वखर्चाने जितके जमेल तितके करत राहायचे या एकाच भावनेने वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची गरज ते भागवित आहेत. याही वर्षी त्यांनी एकाच दिवशी बारामतीनजिक असलेल्या अकरा पाणवठ्यांमध्ये सहा टँकर म्हणजे 90 हजार लिटर पाणी सोडले. जराडवाडी, उंडवडी, गोजुबावी, गाडीखेल, पारवडी, म्हसोबावाडी येथील हे पाणवठे होते.

दरम्याग गेल्या वर्षी कोविडच्या संकटाच्या काळातही 15 मार्च ते 15 जून या कालावधीत त्यांनी 21 टँकरच्या मदतीने तीन लाख लिटर पाणी वन्यजीवांसाठी स्वखर्चाने पाणवठ्यात सोडले. यंदाही तीन लाख लिटर पाणी सोडण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांचा हा उपक्रम बघून अनेक जण उत्स्फूर्तपणे त्यांना मदतीचा हात पुढे करत आहेत.

अजय शहा, हितेन शहा, मयूरी शहा, प्रफुल्ल जोशी, भवन जुदाल, आदित्य जैन, पंडीत कपिल गोहिल, शिरीष राजाध्यक्ष, संदीप घुगे, प्रसाद सोमवंशी, सुशांत सावंत या मुंबईकरांसह दिल्लीतील परमिंदरसिंग, पुण्यातील सोनिया, रितू व राधिका शहा, वडूजच्या मोना शहा, बारामतीचे मिलिंद, समीर, रवीना, संगीता, मंजुषा, सलोनी व कुसुम शहा यांनी या उपक्रमात मदत केलेली आहे.

मुक्या जीवांसाठीच फक्त हा उपक्रम

ज्यांना बोलता येत नाही अशा जंगलातील मुक्या जिवांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते, त्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे. हळुहळू अनेक हात मदतीसाठी पुढे येत असून लोकसहभागातून हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा मानस आहे- मिलिंद वाघोलीकर, बारामती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT