baramati cooperation kharedi vikri sangh president vikram bhosale vice president sonali jaypatre Sakal
पुणे

Baramati News : बारामती खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी विक्रम भोसले

बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केली.

मिलिंद संगई, बारामती..

बारामती : येथील बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी विक्रम आनंदराव भोसले तर उपाध्यक्षपदी सोनाली दादासो जायपत्रे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदासाठी विक्रम आनंदराव भोसले (वाणेवाडी, ता. बारामती) तर उपाध्यक्षपदी सोनाली दादासो जायपत्रे (रा.मुढाळे, ता. बारामती)

यांची नावे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केली. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी दोनच अर्ज आल्याने सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना 1963 मध्ये झाली. या संस्थेची उलाढाल आज 117 कोटी रुपये असून संस्थेच्या विविध दुकानांच्या 22 शाखा कार्यरत आहेत. औषधे, बी बियाणे, खते, रासायनिक औषधांचा व्यापार संघाच्या वतीने केला जातो.

संघामध्ये 126 कर्मचारी कार्यरत असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही संस्था महत्त्वाची आहे. बारामती तालुक्यातील एक प्रमुख सहकारी संस्था म्हणून खरेदी विक्री संघाकडे पाहिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: राहुल गांधींविरोधातील याचिकेवर CJI सूर्यकांत वकिलावर संतापले; अचानक सुनावणीचं थेट प्रक्षेपण बंद!

Tiger Shroff Firing: लॉरेन्स बिश्नोईच्या मुसक्या आवळल्या! साबरमती जेलमधील ‘दो सौ खोली’ हलविले

Pune Graduate election counting latest update : पुणे पदवीधर मतदार संघातील पहिली अपडेट आली समोर, लिंबू, बिबवे आढळल्याने गोंधळ

गुलाल आपलाच! मतमोजणी सुरू होताच कराळे मास्तरांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास; म्हणाले, ४०-४५ हजार मते मिळतील

Latest Marathi News Live Update : अमरावतीत लोकशाही भवनात मतमोजणी सुरू; १४ टेबलवर १४ हजार मतपत्रिकांची मोजणी

SCROLL FOR NEXT