corona_vaccination 
पुणे

Corona Vaccination: बारामतीची लसीकरणातही आघाडी; 33 केंद्राद्वारे लसीकरण सुरू

सकाळ वृत्तसेवा

बारामती (पुणे) : एकीकडे कोरोनाचा आकडा वाढत असला तरी दुसरीकडे बारामती शहर आणि तालुक्याने लसीकरणातही आघाडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर आता बारामती तालुक्यातील 18 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आणि सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी याबाबत माहिती दिली. 

बारामतीत पूर्वीची 15 लसीकरण केंद्र आणि नव्याने सुरु करण्यात आलेली 18 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील लसीकरण केंद्र अशा एकूण 33 केंद्राच्या माध्यमातून आता लसीकरण मोहिम सुरू झाली आहे. 

खाजगी रुग्णालयात लस घेताना कोविन या अँपमध्ये नोंदणी गरजेची आहे, सरकारी रुग्णालयात प्रत्यक्ष आलेल्या किंवा जागेवर नोंदणी केलेल्यांनाही लस देण्यात येत आहे. साठ वर्षांवरील ज्येष्ठांना प्राधान्याने त्या नंतर 45 ते 60 वर्षांपर्यंतच्या असाध्य आजार असलेल्या नागरिकांना आणि त्या नंतर 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा क्रम ठरविण्यात आला आहे. आज एप्रिलच्या पहिल्याच दिवशी 1464 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 

सोमवारपासून शारदा प्रांगणात लसीकरण
सोमवारपासून (ता.5) नगरपालिकेसमोरील शारदा प्रांगणातील शाळेमध्ये लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. बारामती शहरातील नागरिकांना हे मध्यवर्ती ठिकाण असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार येथे केंद्र सुरु करत असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT