Accident Sakal
पुणे

बारामतीचे नगरसेवक किरण गुजर यांच्या गाडीला अपघात

बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या इनोवा या गाडीस आज दुपारी सासवड जेजुरी या रस्त्यावर अपघात झाला.

मिलिंद संगई,

बारामती - येथील बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या इनोवा या गाडीस आज दुपारी सासवड जेजुरी या रस्त्यावर अपघात झाला.

सुदैवाने या अपघातात किरण गुजर यांना कोणतीही दुखापत झाली नाही. शाळेतील विद्यार्थी रस्त्यावर आल्यानंतर समोरील गाडीने अचानक ब्रेक मारल्यामुळे त्यांच्या गाडीने समोरील गाडीला पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.

या अपघातांमध्ये त्यांच्या गाडीच्या एअरबॅग खुल्या झाल्या , त्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही. गाडीचा वेग हा मर्यादित होता त्यामुळे देखील फारशी दुखापत झाली नाही. मात्र या अपघातांमध्ये ईनोवा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किरण गुजर यांच्यावर काही जबाबदारी सोपवली होती. बँकेच्या निवडणूक प्रक्रियेची छाननी करून ते पुण्यावरून बारामती कडे निघाले असताना सासवड पासून आठ कि.मी. अंतरावर हा अपघात घडला. सुदैवाने यामध्ये कोणाला ही फारशी मोठी दुखापत झाली नाही.

ईनोवा गाडी असल्यामुळे यामध्ये किरण गुजर हे बचावले आहेत. मात्र या अपघातांमध्ये ईनोवा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. आपण सुखरूप असून कोणीही काळजी करू नये असे किरण गुजर यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

SCROLL FOR NEXT