बारामती/सोमेश्वरनगर, ता. ८ : बारामती तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९६.३५ टक्के लागला आहे. तालुक्यात तब्बल ३६ शाळा शंभर नंबरी ठरल्या आहेत. बारामतीत ६७४९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ६५०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विशेष प्रावीण्यात २८९२, प्रथम श्रेणीत २०३९, द्वितीय श्रेणीत १२१८, उत्तीर्ण श्रेणीत ३५४ विद्यार्थी आहेत. बहुतांश शाळांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे.
शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा- विठ्ठल विद्यालय भिकोबानगर, न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी, पीव्हीजी बालविकास मंदिर, शिरसाई विद्यालय शिर्सुफळ, न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती, शारदाबाई पवार विद्यानिकेतन, न्यू इंग्लिश स्कूल मेखळी, माध्यमिक विद्यालय गडदरवाडी, भैरवनाथ विद्यालय, बाबुर्डी, न्यू इंग्लिश स्कूल ढाकळे, उर्दू विद्यालय बारामती, छत्रपती हायस्कूल निंबोडी, भैरवनाथ विद्यालय मेडद, उत्कर्ष आश्रमशाळा वाघळवाडी, जनहित प्रतिष्ठान बारामती, एसव्हीपीएम स्कूल, मोरोपंत विद्यालय, सिद्धेश्वर स्कूल, राजे न्यू इंग्लिश स्कूल, अभिनव इंटरनॅशनल स्कूल,
सोमेश्वर पब्लिक स्कूल, शारदा निकेतन इंग्लिश स्कूल, शारदाबाई पवार विद्यानिकेतन डे स्कूल, संत सावतामाळी स्कूल, सरस्वती माध्यमिक विद्यालय,
वसंतराव पवार विद्यालय देऊळगाव रसाळ, क्रिएटिव्ह स्कूल, आदित्य स्कूल, व्हीपी इंग्लिश स्कूल सुपे, बीएकेएपी स्कूल, गुरुकुल स्कूल,
संत तुकाराम विद्यालय डोर्लेवाडी, बालविकास मंदिर, एमईएस देशपांडे स्कूल, लडकत स्कूल, विठ्ठल विद्यालय कांबळेश्वर.
शाळानिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- एमईएस हायस्कूल बारामती- ९७.७८, शंभूसिंह हायस्कूल माळेगाव बुद्रुक- ९६.९६, शाहू हायस्कूल बारामती- ८४.०२, मिशन हायस्कूल बारामती- ४४.४४, स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर- ८८.४६, वसतिगृह विद्यालय काऱ्हाटी- ९६.८९,
नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे- ९९.३८, शहाजी हायस्कूल सुपे- ९६.६८, पाटील विद्यालय सांगवी- ९५.३८, छ. शिवाजी विद्यालय मुर्टी- ९१.३७, मयुरेश्वर विद्यालय मोरगाव- ९५.८३, न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडी- ९५.७१, जनसेवा विद्यालय उंडवडी- ९७.२२, आगरवाल हायस्कूल- ९४.६९,
सिद्धेश्वर हायस्कूल कोऱ्हाळे बुद्रुक- ९८.८८, न्यू इंग्लिश स्कूल कारखेल- ९७.९१, सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर ९८.३१, पवार विद्यालय शिवनगर- ९५.५१, आनंद विद्यालय होळ- ९२.१०, न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर- ९२.०४, सोमेश्वर विद्यालय अंजनगाव- ८६.७९, न्यू इंग्लिश स्कूल खलाटेवस्ती- ८८.८८, वाघेश्वरी विद्यालय नीरावागज- ९३.७५, छत्रपती हायस्कूल सोनगाव- ९७.२९, गावडे विद्यालय पारवडी- ९८.८७, घोरपडे विद्यालय पिंपळी- ८१.२५, व्हीपी मराठी हायस्कूल- ९९.७०, माध्यमिक विद्यालय करंजे- ९०.७८, सातव विद्यालय बारामती, सोमेश्वर विद्यालय आंबी बुद्रुक, सोमेश्वर विद्यालय मुढाळे, छत्रपती हायस्कूल काटेवाडी, न्यू इंग्लिश स्कूल गोजूबावी, खंडेश्वरी विद्यालय खांडज, न्यू इंग्लिश स्कूल नारोळी- ९६.५५, काकडे विद्यालय निंबूत- ९४.११, भैरवनाथ विद्यालय कोऱ्हाळे खुर्द- ८६.२०, पवार विद्यालय पळशी- ८७.५०, व्हीपी इंग्लिश स्कूल- ९८.७९, बालविकास मंदिर- ९७.२९, चैतन्याज स्कूल- ९९.७७, ज्ञानसागर स्कूल- ९८.२१, अजितदादा स्कूल- ९९.५४.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.