राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी, निवडणूक अधिकाऱ्यांकडून पोलिस बंदोबस्त देण्याचे निर्देश Sakal
पुणे

Lok Sabha Poll: बारामती, दौंड, इंदापूर, खडकवासला मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी, निवडणूक अधिकाऱ्यांकडून पोलिस बंदोबस्त देण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, दौंड, इंदापूर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या मतदारसंघात पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवून उपाययोजना कराव्यात.

तसेच, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आचारसंहिता पथके कार्यरत ठेवावीत, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बारामती, दौंड, इंदापूर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ गैरप्रकार होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या चार विधानसभा मतदार संघ संवेदनशील जाहीर करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे इ-मेलद्वारे केली होती.

या संदर्भात मतदारसंघात कोणताही गैरप्रकार घडू नये. मतदारांना त्रास होणार नाही, यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. तसेच, आचारसंहिता पथके कार्यरत ठेवावीत, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी द्विवेदी यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT