पुणे

अभय योजनेतून ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी

CD

बारामती, ता. १७ : महावितरणच्या ‘अभय योजना २०२६-२७’मधून बारामती परिमंडलातील २ लाख ८१ हजार ३८१ वीजग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ग्राहकांकडे २७४ कोटी रुपयांची मूळ थकबाकी असून, त्यावरील ३८ कोटी ५९ लाख रुपयांचे व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहेत. तसेच, मूळ थकबाकीच्या एकरकमी भरण्यावर २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.
बारामती, सोलापूर आणि सातारा या तीन मंडलांतील पात्र ग्राहकांसाठी ही योजना ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत लागू आहे. बारामती मंडलातील ६६ हजार ६३४ ग्राहकांकडे १२८.२६ कोटी, सोलापूर मंडलातील १ लाख ५८ हजार १० ग्राहकांकडे १०६.२३ कोटी, तर सातारा मंडलातील ५६ हजार ७३७ ग्राहकांकडे ३९.४६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना १५ डिसेंबरपर्यंत १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. तसेच लघुदाब ग्राहकांना ५० टक्के रक्कम भरून उर्वरित रक्कम सहा व्याजमुक्त हप्त्यांत भरण्याची सुविधा आहे. पात्र ग्राहकांचे पुनर्जोडणी शुल्कही माफ करण्यात येणार आहे.
ग्राहकांनी या संधीचा लाभ घेऊन थकबाकी निकाली काढावी व पुन्हा वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री पाहिजे'', मौलाना साजिद रशिदी यांचा विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला

Pimpri Dairy Farm Flyover : डेअरी फार्म उड्डाणपुलाचा फायदा की नवा धोका? राँग साइड वाहनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मंगळचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश; पुढील ३२ दिवस 'या' ३ राशींना बसू शकतो फटका!

Kaygaon News : ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक; जुने कायगाव येथील शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित

Pune sugarcane rate : ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी पुढाकार घेणार का? सर्व कारखानदार, शेतकरी आणि संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीची मागणी

SCROLL FOR NEXT