ajit pawar sakal
पुणे

Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामतीतील विकासकामांची पाहणी

जवाहरबाग ते परकाळे बंगला येथील कॅनॉलचे सुशोभिकरण व सेंट्रल पार्क येथील विविध विकास कामांची पाहणी करुन अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

बारामती - प्रशासकीय भवनाशेजारी तयार करण्यात येणा-या नऊ एकर जागेवरील सेंट्रल पार्कमध्ये मनोरा उभारण्यात येणार असून या द्वारे बारामतीकरांना उद्यानाचे विहंगम दृश्य पाहता येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. 15) बारामती परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करुन अधिका-यांना सूचना दिल्या.

जवाहरबाग ते परकाळे बंगला येथील कॅनॉलचे सुशोभिकरण व सेंट्रल पार्क येथील विविध विकास कामांची पाहणी करुन अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

सार्वजनिक विकासकामे करतांना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. जवाहरबाग ते परकाळे बंगला येथील कॅनॉल दरम्यान बांधण्यात येणाऱ्या पायऱ्यांवरुन पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा होईल अशी रचना असावी. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

सेंट्रल पार्कमधील बैठक व्यवस्था, पदपथ, प्रेक्षागृह, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान बालकांसाठी उभारण्यात येणारे पार्क आदी कामे करतांना गर्दीचे योग्यप्रकारे नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT