बारामती, ता. ५ : कर्जबाजारी झाल्याने सोन्याचे दागिने विकून पैसे मिळवण्याच्या उद्देशाने विकास ऊर्फ अप्पा राजेंद्र लडकत (वय २५, रा. शेरेवाडी, ता. बारामती) याने दुहेरी हत्याकांड घडवून आणले. त्याच्याकडून चोरलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.
संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी सोमवारी (ता. ५) बारामतीत पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. शेरेचीवाडी येथे २९ सप्टेंबरला इंदुमती मारुती लडकत व कृष्णाबाई कुंडलिक लडकत या दोन महिलांचा खून झाला होता. या खुनाचा उलगडा पोलिसांनी केलेला असून यात चुलत नातवानेच पैशांसाठी हा दुहेरी खून केल्याचे समोर आले आहे. अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी या अत्यंत क्लिष्ट दुहेरी खूनाचा गुन्हा उघड केला, असे गिल म्हणाले.
गिल म्हणाले की, ''''ही घटना घडल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः दूरध्वनी करुन मला सूचना केल्या होत्या. या कामी आठ पथके तयार केली होती, २००पेक्षा अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली, २००पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमे-यांचे चित्रिकरण तपासले गेले, तांत्रिक विश्लेषणासह स्थानिक पातळीवरही दोन पथके चौकशी करत होती. या चौकशीतूनच विकास लडकत याच्यावर संशयाची सुई गेली, त्या नंतर त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबूली दिली. विकास लडकत याला सर्व माहिती असल्याने त्याने सहजपणे खून करुन दागिन्यांची चोरी केली.'''' या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रमोद क्षीरसागर, सुपे पोलिस ठाण्याचे शशिकांत शेळके, महादेव शेलार, सुधीर वाळुंज, युवराज धोंडे, ज्ञानेश्वर राऊत यांच्यासह अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी या तपासासाठी परिश्रम केले.
जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, त्यांची काळजी नातेवाइकांनी घ्यायला हवी, आपल्या परिसरात काही संशयित वावरत असतील तर तातडीने पोलिसांना कळवायला हवे. वेळेत पोलिसांना माहिती मिळाली तर अनेक गुन्हे होण्याअगोदरच त्याला प्रतिबंध करता येऊ शकतो.
- संदीपसिंग गिल, पोलिस अधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.