बारामती, ता. १७ : शहरातील इंगळेवस्ती येथे पोलिसांनी छापा टाकून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा सुमारे एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सागर मधुकर साळुंखे (वय ३३, रा. मदनवाडी, भिगवण, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध बारामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर साळुंखे यास ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडून विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या आदेशाने करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी संदीप दिगंबरराव शिंदे यांनी फिर्याद दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.