economy sakal
पुणे

Baramati Economy : 1093 कोटी रुपयांनी बदलले बारामतीचे अर्थकारण

गेल्या काही महिन्यात बारामती पंचक्रोशीच्या अर्थकारणाला वेगळी दिशा प्राप्त झाली असून येत्या कालावधीतही बारामती पंचक्रोशीतील अर्थकारणामध्ये घसघशीत वाढच होणार आहे.

मिलिंद संगई,

गेल्या काही महिन्यात बारामती पंचक्रोशीच्या अर्थकारणाला वेगळी दिशा प्राप्त झाली असून येत्या कालावधीतही बारामती पंचक्रोशीतील अर्थकारणामध्ये घसघशीत वाढच होणार आहे.

बारामती - गेल्या काही महिन्यात बारामती पंचक्रोशीच्या अर्थकारणाला वेगळी दिशा प्राप्त झाली असून येत्या कालावधीतही बारामती पंचक्रोशीतील अर्थकारणामध्ये घसघशीत वाढच होणार आहे. या अर्थकारण बदलाचे कारण म्हणजे भूसंपादनापोटी मिळालेली रक्कम.

विकासाच्या विविध प्रकल्पांनी वेग पकडल्यानंतर भूसंपादनाचीही कामे वेगाने झाली तर काही ठिकाणी अजूनही सुरु आहेत. या भूसंपादनापोटी बारामती, इंदापूर व दौंड या तीन तालुक्यात मिळून आतापर्यंत 1093 कोटी 29 लाख रुपयांचे वाटप शासनाकडून लाभार्थ्यांना झालेले आहे.

पाटस ते बारामती या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या भूसंपादनापोटी आतापर्यंत 424 कोटी, कण्हेरी ते इंदापूर या टप्प्यासाठी 314 कोटी रुपये तर वडापुरी ते सराटी या मार्गासाठी 168 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या तिन्ही टप्प्यांसाठी 1236 कोटी रुपये भूसंपादनासाठी मिळणार असून त्या पैकी 907 कोटी रुपयांचे वाटप प्रत्यक्षात झालेले आहे.

बारामती ते फलटण रेल्वे मार्गाच्या भूसंपादनापोटी आतापर्यंत 186 कोटी रुपयांचे वाटप झालेले असून, अजून 50 कोटी रुपये महसूल विभागाकडे शिल्लक आहेत. रेल्वे भूसंपादन प्रक्रीया आगामी सहा महिन्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांचा प्रयत्न असून त्या दृष्टीने आता सक्तीने भूसंपादनाची प्रक्रीया सुरु झाली आहे. 186 हेक्टरपैकी 134 हेक्टरचे भूसंपादन पूर्ण झालेले आहे.

दरम्यान उंडवडी ते बारामती या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच-160 या मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रीया सुरु झाली असून यातील भूसंपादनातूही भरीव रक्कम बारामती तालुक्यातील जमीनमालकांना प्राप्त होणार आहे.

बारामती पंचक्रोशीत भूसंपादनापोटी आलेल्या रकमेतून अनेकांनी शेत जमीन, शहरालगत अकृषक जमीन खरेदी, सदनिका, व्यापारी गाळे, सोने खरेदीसह वाहन खरेदी मोठया प्रमाणावर केली आहे. या मुळे बारामतीच्या अर्थकारणाला एक वेगळी गती मिळाली आहे. अजूनही बारामतीत काही कोटी रुपयांची रक्कम भूसंपादनातून येणार असल्याने त्याचा फायदा अर्थकारण सुस्थितीत येण्यास होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT