पुणे

बारामतीत वीजचोरांना महावितरणचा ‘करंट’

CD

बारामती, ता. २५ : ‘महावितरण’च्या बारामती परिमंडळात वीजचोरीविरोधात धडक मोहीम सुरू असून, जुलै महिन्यापासून १९ ऑगस्टपर्यंतच्या दीड महिन्याच्या कालावधीत वीजचोरीप्रकरणी तब्बल एक हजार ७५९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

तालुक्यात एक हजार ३१० प्रकरणांमध्ये सुमारे १२ लाख २७ हजार युनिट वीजचोरी आढळून आली असून, संबंधितांकडून दोन कोटी ७२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
बारामती परिमंडळातील कारवाईमध्ये सोलापूर मंडळ आघाडीवर आहे. सोलापूर मंडळात एक हजार ८१ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ७०८ प्रकरणांमध्ये सात लाख पाच हजार युनिट वीजचोरी आढळली असून, एक कोटी ५९ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
सातारा मंडळात २४५ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी २११ प्रकरणांमध्ये एक लाख ४० हजार युनिट वीजचोरी आढळून आली असून, २७ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर बारामती ग्रामीण मंडळात ४३३ जणांवर कारवाई करण्यात आली असून, ३९१ प्रकरणांत तीन लाख ८२ हजार युनिट वीजचोरी आढळली. या प्रकरणांत ८६ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
वीजचोरी केल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा
वीज चोरी प्रकरणात प्रकरणात तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.
वीजचोरीला प्रोत्साहन देणे, मदत करणे किंवा त्यासाठी सहकार्य करणे हा देखील गुन्हा आहे. विद्युत अधिनियमातील कलम १५० नुसार अशा व्यक्तींवर संबंधित गुन्ह्याच्या शिक्षेप्रमाणे कारवाई होऊ शकते.
दृष्टिक्षेपात :
१,७५९ जणांवर कारवाई
१,३१० प्रकरणांत वीजचोरी निष्पन्न
१२ लाख २७ हजार युनिट वीजचोरी
२ कोटी ७२ लाख रुपये दंड
सोलापूर मंडळ : एक कोटी ५९ लाख रुपये दंड
बारामती ग्रामीण : ८६ लाख रुपये दंड
सातारा मंडळ : २७ लाख रुपये दंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada: लॉटरीची घरे घटणार? २० टक्के योजनेतील घरांवरून म्हाडा-पालिका पेच

Young Age Lifestyle Diseases: तिशीतच वाढतोय डायबेटीस-BPचा धोका! तरुणांच्या मेटाबॉलिक हेल्थमध्ये नेमकं काय बिघडतंय?

IND vs SL, 2nd Test: श्रीलंकेकडून फाईटबॅक! सोनल दिनूशाची शतकाकडे वाटचाल; भारत फॉलोऑन देणार?

Driving License: RTO मध्ये न जाता घरबसल्या बदला ड्रायव्हिंग लायसेन्सवरील पत्ता! जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Nitin Gadkari Clarification : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार? कार्यालयाकडून अखेर मोठं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT