Ajit Pawar
Ajit Pawar Sakal
पुणे

Ajit Pawar : एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाचे काम प्रशंसनीय

मिलिंद संगई,

एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून बारामतीत सुरू असलेली नेत्रदानाची चळवळ ही प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी काढले.

बारामती - एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून बारामतीत सुरू असलेली नेत्रदानाची चळवळ ही प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी काढले.

महाराष्ट्र शासन, पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पुणे जिल्हा अंधत्व निवारण समिती व एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती यांच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बिन टाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन गुरुवारी (ता. 19) अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

ज्येष्ठ नेत्र रोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या वतीने 2011 पासून बारामतीत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन केले जाते, याचा उल्लेख करीत अजित पवार यांनी या चळवळीमुळे सहा हजाराहून अधिक गरजूंची ऑपरेशन झाली असून त्यांना नवदृष्टी मिळाल्याचा उल्लेख केला.

या माध्यमातून जवळपास एक लाख रुग्णांची डोळ्यांची तपासणी डॉ. लहाने डॉ. पारेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचेही अजित पवार यांनी यावेळी नमूद केले. सेवाभावी संस्थांच्या मदतीतून कशा उत्तम पद्धतीने काम होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया असल्याचा उल्लेख अजित पवार यांनी केला.

विविध क्षेत्रातील मान्यवर या संस्थेच्या निमित्ताने एकत्रित सामाजिक बांधिलकी जपत एक चांगले काम बारामतीत करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सुनेत्रा पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या गेल्या बारा वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. जलसंधारण, विज्ञान, आरोग्य, कला, क्रीडा या क्षेत्रात फोरमने केलेल्या कामाची माहिती त्यांनी सविस्तरपणे दिली. सायकल रॅली, नेचर हेरिटेज वॉक, वृक्षारोपण, हात धुवा दिवस, मातीतील खेळांची जत्रा असे अनेक उपक्रम पूर्ण सर्वप्रथम बारामती सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी डॉ. तात्याराव लहाने यांनीही मनोगत व्यक्त केले. मधुमेहामुळे शहरी जीवनात अनेक समस्या निर्माण होत असून मधुमेहावर नियंत्रण आणण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखवली. डोळ्यांची काळजी व इतर बाबींबाबत त्यांनी माहिती दिली.

फोरमच्या वतीने कापडी पिशवी व्हेंडिंग मशीन नगरपालिकेस भेट

याप्रसंगी अजित पवार यांच्या हस्ते एन्व्हायरमेंटल फोरम व महालक्ष्मी उद्योग समूह यांच्या वतीने कापडी पिशवी व्हेंडींग मशीन बारामती नगरपालिकेत सुपूर्द करण्यात आले. या मशीन मध्ये पैसे टाकून किंवा बारकोड स्कॅन करून नागरिक कापडी पिशवी मिळवू शकतात. गर्दीच्या ठिकाणी प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर बंद करून त्याला पर्याय म्हणून फोरमच्या वतीने ही मशीन नगरपालिकेस भेट देण्यात आले असल्याचे सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात प्रथमच नगरपालिकेला एखाद्या सेवाभावी संस्थेने अशा प्रकारची वेंडिंग मशीन देण्याचा हा पहिला प्रसंग होता.

माझ्यावरही लहाने यांनी केले उपचार

काही महिन्यांपूर्वी माझ्या डोळ्याला त्रास होत असल्याने मी लहाने यांच्याकडे गेलो. त्यांनी माझे डोळे तपासल्यानंतर दहा लाख लोकात क्वचित असलेला एक आजार असल्याचे सांगितले. त्यावर मी देखील तातडीने माझ्यावर येथेच उपचार करा असे सांगितले, त्यांनी छोटीशी शस्त्रक्रिया करीत माझे डोळे नीट केले. तातडीने त्याच्यावर उपचार केले असा किस्साही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

लहाने यांना खासदारकीची ऑफर होती, याचा मी साक्षीदार आहे, मात्र त्यांनी आपल्याला नेत्रदान चळवळीतच काम करायची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांचा राजकारणात प्रवेश झाला नाही, असाही किसा अजित पवार यांनी यावेळी सांगितला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT