पुणे

बारामतीतील महिलेला फेसबुक मैत्री पडली महागात

CD

बारामती, ता. १६ : कॅनडातून ३८ लाख रुपये रोख व मौल्यवान वस्तूंचे पार्सल आल्याचे सांगून कस्टम ड्युटी, कर व अन्य शुल्काच्या नावाखाली बारामतीतील अनिता भाऊसो शिंगटे (वय ३३, रा. अभिमन्यू कॉर्नर, व्ही. पी. कॉलेजजवळ, बारामती) यांच्याकडून ७ लाख ५६ हजार ५०० रुपये ऑनलाइन उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
अनिता शिंगटे यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात विराट मेहता (रा. कॅनडा, मूळ गुजरात) या नावाच्या फेसबुक खात्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. फेसबुक व व्हॉट्सॲपवर सुमारे दोन महिने संभाषण झाले. त्यानंतर १४ जुलैला दिल्ली विमानतळ कार्गो विभागातून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या नावाने पार्सल आल्याचे सांगण्यात आले. पार्सल सोडविण्यासाठी कस्टम शुल्क, कर व विविध कारणे सांगत आरोपींनी ३० हजारांपासून पुढे वारंवार रक्कम मागितली. वेगवेगळ्या व्यवहारांतून ७ लाख ५६ हजार ५०० रुपये घेतल्यानंतर आणखी पैसे मागण्यात आल्याने शिंगटे यांना संशय आला.या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात विराट मेहता याच्यासह अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chakan Talegaon Traffic: चाकण तळेगाव वाहतूक कोंडीचा प्रश्न आता सुटणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा, नेमकी किती महिन्यांची दिली डेडलाइन?

अर्थवेध : ‘इन्स्टंट लोन’चा सापळा

ढिंग टांग : स्टँडप कॉमेडी शो..!

Puranachi Dinda: पुरणपोळीपेक्षा हटके! नागपंचमीला नक्की करून पाहा पारंपरिक पुरणाची दिंड; नोट करा सोपी रेसिपी

आजचे राशिभविष्य - १७ ऑगस्ट २०२६

SCROLL FOR NEXT