पुणे

शारदानगरमध्ये पाण्यासाठी आक्रोश मोर्चा

CD

माळेगाव, ता. १७ : नीरा डावा कालव्याअंतर्गत बारामती तालुक्यातील २४ फाट्यासह माळेगाव, पणदरे परिसरातील रोखलेले सिंचन आवर्तन तातडीने सुरू करा. अन्यथा माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गेटकेन उसाचे गाळप थांबवून आडसाली उसाचे गाळप सुरू करावे, अशी आक्रमक मागणी करीत शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. १७) शारदानगर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर लक्षवेधी आक्रोश मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांनी २२ ऑक्टोबरपर्यंत पाणी न सोडल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला.

जलसंपदा विभागाने नीरा डावा कालव्याचे पाणी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. माळेगाव, सांगवी, निरावागज, खांडज, घाडगेवाडी, मेखळी, मळद, शिरवली आदी भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र डुबल व उपविभागीय अभियंता अंबादास तुकाराम नारायणकर यांच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे!’ अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, बाळासाहेब वाबळे, मदनराव देवकाते, डॉ. अनिल सोरटे, अविनाश देवकाते, राजेश देवकाते, नितीन आटोळे, अनिल तावरे, रमेश देवकाते आदी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.

पाणी नाही तर उसाचे गाळप तरी करा..!
एका बाजूला सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने उभ्या पिकांना फटका बसण्याची भीती आहे तर दुसऱ्या बाजूला माळेगाव कारखाना प्रशासनाकडून गेटकेन उसाला गाळपात प्राधान्य दिले जात असल्याने आडसाली ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उसाला पाणी मिळत नाही आणि वेळेत गाळपही होत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे एकतर सिंचनासाठी पाणी सोडावे किंवा आडसाली उसाचे गाळप तातडीने सुरू करावे, अशी मागणी तुकाराम गावडे, हरिश्चंद्र टाकळे आदींनी केली.

बारामतीवर अन्याय का?
बारामतीच्या वाट्याचे पाणी इंदापूर तालुक्यातील शेटफळ तलावासाठी कसे वळविण्यात आले? कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला, याची माहिती मिळाली पाहिजे, अशी भूमिका युवराज तावरे, राजेश देवकाते आदींनी मांडली. दुष्काळी परिस्थिती असताना आणि बारामतीच्या वाट्याच्या पाण्याची गरज असताना इंदापूर तालुक्यातील शेटफळ तलाव भरून देण्यात आला, याबाबत शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला.

नीरा डावा कालव्याला काही ठिकाणी गळती होत असून, ती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल.
- राजेंद्र डुबल, कार्यकारी अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT