पुणे

खूनप्रकरणी बापलेकास जन्मठेप

CD

बारामती, ता. १९ : खुनाच्या गुन्ह्यातील बापलेकास बारामती येथील जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी गोरख आबा काळे व अक्षय आबा काळे (रा. खोरवडी, ता. दौंड) यांना दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली.
खोरवडी (ता. दौंड) येथे २४ फेब्रुवारी २०२२ला फिर्यादी यांचा मुलगा जयदीप किसन चव्हाण यांच्यावर आरोपींनी लोखंडी रॉड व दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी तपास करून दोषारोपपत्र बारामती न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी १४ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकाऱ्यांची साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरविले. खटल्याच्या कामकाजात विशेष सरकारी वकील ॲड. ज्ञानदेव शिंगाडे यांना ॲड. योगेश लालबिगे, कोर्ट पैरवी अधिकारी सहायक फौजदार अभिमन्यू कवडे, कोर्ट अंमलदार महिला पोलिस हवालदार मनीषा आहिवळे तसेच सरकारी अभियोक्ता कार्यालयाचे लिपिक एस. एस. कांबळे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावाने ग्राहकांना रडवलं! सोनं 16 हजारांनी महागलं; आता 10 ग्रॅम कितीला? पाहा ताजा भाव

Cab Driver Marathi : वादाला सुरुवात झाली ! मराठीत ओटीपी सांगितल्याने कॅब चालक प्रवाशावर चिडला; VIDEO VIRAL होताच नेटकरी संतापले

ऐश्वर्या नारकरांच्या घरी आली ‘नवी पाहुणी’; खरेदी केली नवी कोरी गाडी, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Latest Marathi News Live Update : कोंढवा परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या सराईत आरोपीसह ३० जण ताब्यात, २.५ किलो गांजा जप्त

Kolya Mahadev Temple: हेमाडपंथी स्थापत्याचा अद्भुत नमुना! कोळ्याच्या महादेव मंदिराची नंदीवरील शिवपिंड ठरली श्रद्धेचे केंद्र

SCROLL FOR NEXT