बारामती, ता. ११ : शहरातील एका युवतीच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार अथर्व राजेंद्र मेहन (वय २७, रा. गजानन अपार्टमेंट, बारामती) याच्याविरुद्ध बारामती शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संबंधित युवतीचे अथर्वसोबत प्रेमसंबंध होते व दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या विवाहास संमती दिली होती. मात्र, घटनेच्या काही दिवस आधी ती शांत राहत असल्याचे आईच्या निदर्शनास आले होते. तिच्या मैत्रिणीकडून अथर्व काही गोळ्या देत असल्याची माहिती मिळाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. गुरुवारी (ता. ६) अथर्व युवतीला एमबीए प्रवेशाच्या कामासाठी एका महाविद्यालयात घेऊन गेला होता. सायंकाळी फोनवर बोलताना अथर्व तिला त्याच्या घरी घेऊन जाणार असून गोळी देणार असल्याचे तिने सांगितल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. रात्री अथर्वने युवतीला चक्कर आल्याचे सांगून दोन खासगी रुग्णालयांत नेले, तेथून तिला सिल्व्हर ज्युबिली दवाखान्यात दाखल केले. तेथे तिचा मृत्यू झाला. युवतीला कोणते औषध किंवा अन्य पदार्थ देण्यात आला होता का? त्याचा मृत्यूशी संबंध आहे का आणि मृत्यूचे निश्चित वैद्यकीय कारण काय, याचा वैद्यकीय, रासायनिक, डिजिटल व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत मृत्यूच्या कारणाबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.