वडगाव निंबाळकर, ता. २२ : सायंबाचीवाडी (ता. बारामती) येथे शेतात सुबाभळीचा पाला तोडणाऱ्या ६७ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून दुचाकीस्वार तरुण पसार झाल्याची घटना घडली.
या प्रकरणी मुक्ताबाई चंदरराव भापकर यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता. १९) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
मुक्ताबाई भापकर या लोणी-भापकर ते जळकेवाडी रस्त्यालगतच्या शेतात सुबाभळीचा पाला तोडत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी तरुणाने शेताकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर दुचाकी थांबवली. त्यानंतर तो पायी महिलेच्या जवळ गेला. ‘आजी, मला सुबाभळीचा पाला न्यायचा आहे,’ असे सांगत त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली.
बोलण्याच्या बहाण्याने जवळ आल्यानंतर काही क्षणांतच त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून तोडली आणि दुचाकीवरून वेगाने पसार झाला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर शेजारील शेतात काम करणाऱ्या त्यांच्या सून स्नेहा भापकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान मणी व पोत असून, त्याची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.