शेटफळगढे, ता. १९ : बारामती-भिगवण राज्य मार्गावरील शेटफळगढे (ता. इंदापूर) हद्दीत बुलेटला धडक देऊन पसार झालेल्या कारचा भिगवण पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी कारसह चालकाला ताब्यात घेण्यात आले असून सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
रविवारी (ता. १३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोठारी फार्मजवळ झालेल्या भीषण अपघातात साहिल प्रवीण भोसले (वय २५, रा. उद्धट) याचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला होता. भिगवण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांच्या मदतीने पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कारचा (एमएच ४२ एएस ८१२३) शोध लावला. चालक विरेंद्र मनोहर सोनवणे (वय ४७, रा. मोतीबाग, गुणवडी, ता. बारामती, जि. पुणे) याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ शेंडगे, नानासाहेब सूर्यवंशी, रामदास कर्चे, सचिन पवार, योगेश कुलकर्णी, तुषार रायकर आणि दत्तात्रय गवळी यांच्या पथकाने केली. पुढील तपास नानासाहेब सूर्यवंशी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.