पुणे

बेकायदेशीर कत्तलखान्यांवर बारामतीत कारवाईची मागणी

CD

बारामती, ता. १५ : शहरातील शासकीय कत्तलखान्यांमध्ये नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर जनावरांची कत्तल होत असल्याचा आरोप करत, हे कत्तलखाने तत्काळ सील करण्याची मागणी गोरक्षकांनी केली आहे. याबाबत मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्याधिकारी पंकज भुसे यांना निवेदन दिले.
निवेदनानुसार, बारामतीत केवळ म्हैस वर्गीय जनावरांच्या कत्तलीस परवानगी असताना इतर जनावरांचीही मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे. या कत्तलखान्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसून, प्राण्यांच्या वैद्यकीय तपासणीचीही कोणतीही नोंद नाही. यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
कऱ्हा नदीपात्रातील आठ कत्तलखाने यापूर्वी सील केले होते. मात्र, संबंधितांनी सील तोडून पुन्हा कत्तली सुरू केल्याचा दावा निवेदनात केला आहे. शेती उपयोगी जनावरांची कत्तल थांबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशांत सातव, ॲड. ज्ञानेश्वर माने, अक्षय देवकाते व अन्य गोरक्षकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बिझनेस सेंटर उभारणार! CIDCO चा मोठा प्रकल्प; व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना

IPL 2026: अम्पायरला शिवी दिली! Mumbai Indians च्या दिग्गजावर कारवाई; पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात घातला राडा अन्...

आता पडद्यावर न पाहिलेले सीन्सही दिसणार! 'Dhurandhar 2' OTT वर प्रदर्शित होणार, कधी, कुठे? वाचा

Paper Leak Case: १० लाखांत कुरिअरने आला, १५ लाखांना विकला अन्... महाराष्ट्रात NEET चा पेपर कसा फुटला? धक्कादायक खुलासा

Dunes League T20 : क्रिकेटच्या कक्षा रुंदावतायेत! सौदी अरेबिया फ्रँचायझी लीगच्या मैदानात; युवराज सिंग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

SCROLL FOR NEXT