baramati karate league 1232 players participated sport marathi news Sakal
पुणे

Baramati News : बारामतीतील राज्यस्तरीय कराटे लीगमध्ये 1232 खेळाडू सहभागी...

बारामती कराटे असोसिएशन व शरयू फाऊंडेशनच्या वतीने स्पर्धा झाल्या.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती - राज्यातील सर्वात मोठ्या कराटे लीग स्पर्धा नुकत्याच बारामतीत पार पडल्या. येथील शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शरयु चषक या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कराटे लीगचे आयोजन शनिवार (ता. 21) व रविवार (ता. 22) असे दोन दिवस करण्यात आले होते.

बारामती कराटे असोसिएशन व शरयू फाऊंडेशनच्या वतीने स्पर्धा झाल्या. पुणे, पिंपरी चिंचवड,सांगली,अहमदनगर , कोल्हापूर, सोलापूर,सातारा, छत्रपती संभाजीमहाराज नगर, रायगड, ठाणे, मुंबई, परभणी, बीड, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील 1232 खेळाडूंनी यात सहभाग घेतला.

शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते कराटे लीगचे उदघाटन झाले, तर विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. मुख्याधिकारी महेश रोकडे, शुभम निंबाळकर, अँड.रोहित काटे, विक्रम निंबाळकर उदघाटन प्रसंगी उपस्थित होते.

25 सर्वोत्कृष्ट खेळाडूंना स्पोर्ट्स सायकल, 10 ते 18 वर्षे वयोगटातील खेळाडूंना विविध वैयक्तिक गटामध्ये तीन लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली गेली. पिंपरी चिंचवडच्या विश्वा स्पोर्ट्स अकॅडमी या संघाला सांघिक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे 1 लाख 11 हजार रुपयांचे पारितोषिक व चषक, कोल्हापूरच्या टीएसएसकेओ संघास 77 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक, तर रांजणगाव पुणे ग्रामीणच्या द चॅम्पियन्स कराटे क्लब या संघाला तृतीय क्रमांकाचे 55 हजारांचे पारितोषिक प्रदान केले गेले.

बारामती कराटे असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक रविंद्र करळे यांच्यासह अभिमन्यू इंगुले, महेश डेंगळे,शिवाजी भिसे, राहुल सोनवणे, मुकेश कांबळे, आयेशा शेख, श्रुती पानसरे, पूजा खाडे, ऋषिकेश मोरे, हर्ष भोसले, जय साबळे, तेजस्विनी जगताप , फराजणा पठाण यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT