पुणे

होळमध्ये साहित्यिकांचा रविवारी सन्मान सोहळा

CD

वडगाव निंबाळकर, ता. २१ : बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील नामवंत साहित्यिक आणि कवींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी बारामती तालुक्यातील साहित्यप्रेमींना मिळणार आहे. पंचक्रोशी प्रकाशन आणि भाग्यलक्ष्मी सोशल फाउंडेशनतर्फे रविवारी (ता. २४) सकाळी १० वाजता होळ-सदोबाचीवाडी (ता. बारामती) येथील अभिषेक मंगल कार्यालयात ‘साहित्यिकांचा सन्मान सोहळा व निमंत्रित कवींचे संमेलन’ आयोजित केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षण संचालक शिवाजी तांबे असतील. यावेळी डॉ. प्रतिमा इंगोले, दिलीप फलटणकर, बबन पोतदार, मोगल जाधव, संतोष पवार, अजित काटकर यांसह बालभारती निर्मिती मंडळातील अनेकजण उपस्थित राहणार आहेत. यावेळी निमंत्रित कवींचे काव्य सादरीकरण होईल. शालेय अभ्यासक्रमातील लेखकांशी संवाद साधण्याची ही दुर्मिळ संधी असून, परिसरातील नवोदित कवी, लेखक आणि विद्यार्थ्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Weather Alert : सांगलीकरांनो, पुढील 5 दिवस घराबाहेर पडताना काळजी घ्या! 50 किमी वेगाने वादळी वारे अन् 'या' वेळेत कोसळणार मुसळधार पाऊस

ULC land Conversion: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! यूएलसी वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर सुलभ; नजराणा शुल्कात मोठी कपात, मात्र शासनाची काय आहे अट ?

'लाडकी बहीण'च्या ई केवायसीला मुदतवाढ मिळाल्याचा व्हिडीओ व्हायरल, महिलांची अर्ज घेण्यासाठी विनवणी; अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

अगं काव्या ताई किती... ज्ञानदाच्या लग्नाच्या तयारीत मृणालच्या लेकीने विचारला असा प्रश्न; ऐकून सगळेच हसून झाले बेजार!

ODI Tri-Series: टीम इंडियात अचानक बदल! विदर्भाच्या खेळाडू संघातून बाहेर, बदली खेळाडूची घोषणा

SCROLL FOR NEXT