पुणे

विद्या प्रतिष्ठानमध्ये नांदी संमेलन

CD

बारामती, ता. १ : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शतकमहोत्सवी साहित्य संमेलनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद बारामती शाखेच्या वतीने बुधवारी (ता. २८) विद्या प्रतिष्ठान येथे एकांकिका साहित्य–नांदी संमेलन पार पडले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून संमेलनाची सुरुवात झाली. संमेलनाचे उद्घाटक ॲड. ए. व्ही. प्रभुणे यांनी आपल्या मनोगतात मराठी साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या. सोमण यांनी ‘एकांकिका लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय’ या विषयावर मार्गदर्शन करताना या कलाप्रकारातील विविध पैलू उलगडले.
यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या सचिव ॲड. नीलिमा गुजर, विश्वस्त डॉ. राजीव शहा व किरण गुजर उपस्थित होते.
संमेलनाच्या अंतिम टप्प्यात विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वप्नील कुचेकर यांच्या दिग्दर्शनाखाली ‘वामन आख्यान’ ही एकांकिका सादर केली. या सादरीकरणाचे सोमण यांनी कौतुक केले.
संमेलनाच्या यशस्वितेसाठी नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर, महाराष्ट्र साहित्य परिषद, बारामती शाखेचे अध्यक्ष संजय जाधव, पदाधिकारी विवेक पांडकर आणि प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी परिश्रम घेतले. उपक्रमाचे नियोजन अनिल डिसले, दीपक सोनवणे, गौरी भोईटे, राजकुमार मुळे आणि स्वप्नील कुचेकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irrigation Department Engineer : स्वेच्छेने पैसे दिले तर स्वीकारतो!; जलसंपदा विभागाच्या इंजिनियरच अजब वक्तव्य, सरकारकडून तातडीने केली कारवाई

'पनवेल-कर्जत'साठी वनजमीन वर्ग, रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाचे काम ९९ टक्के पूर्ण; राज्य सरकारचे आदेश जारी

Latest Marathi News Update : आटपाडी येथील गळवेवाडीत पूर्ववैमनस्यातून पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला

हनी सिंगच्या पुतण्यासह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू, भरधाव कारची ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून धडक; बर्थडे पार्टीहून परतताना दुर्घटना

Tarapur MIDC Fire: तारापूर एमआयडीसीतील गिनी सिल्क मिलला भीषण आग; अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण, जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT