Supriya Sule statement sunetra pawar sakal
पुणे

Baramati Loksabha Election : सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा प्रारंभ कण्हेरीतून होणार....

महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ श्री क्षेत्र कण्हेरी येथून केला जाणार आहे.

मिलिंद संगई,

बारामती - महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ श्री क्षेत्र कण्हेरी येथून केला जाणार आहे.

सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा प्रारंभ शुक्रवारी (ता. 19) रोजी सकाळी आठ वाजता तर सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ शनिवारी (ता. 20) सकाळी दहा वाजता होणार आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुप्रिया सुळे यांचा तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनेत्रा पवार यांचा प्रचाराचा नारळ कण्हेरीच्या मारुतरायाला वाढविला जाणार आहे.

बारामतीत आजवर पवार कुटुंबियांकडून लढलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणूकीचा प्रारंभ कण्हेरीतून करण्याची एक परंपरा आहे. या परंपरेनुसारच दोन्ही बाजूंकडून प्रचाराला प्रारंभ होणार आहे. कण्हेरीचा मारुतराया कोणाला पावणार या बाबत आता मतदारसंघात चर्चा सुरु झाली आहे.

यंदाची निवडणूक देशातील सर्वाधिक लक्षवेधी लढतींपैकी एक असून केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचेही लक्ष या निवडणूकीकडे लागून राहिले आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या वतीने दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ कोणत्या स्टार प्रचारकांच्या सभा बारामती मतदारसंघात होणार या कडे आता सर्वांचेच लक्ष आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या तसेच राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या सभा या मतदारसंघात होणार का या कडे सर्वांचेच लक्ष आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून प्रचार सुरु असून आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला अधिक गती येणार आहे. कॉर्नर सभा, घोंगडी बैठका, पदयात्रा, घरोघरी भेटीगाठी, मेळावे, स्नेह भोजन या माध्यमातून दोन्ही बाजूंनी प्रचाराचा धडाका लावला आहे. समाजमाध्यमांवरुनही वेगाने प्रचार सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT