Supriya Sule ajit pawar Esakal
पुणे

Baramati News : बारामतीत सुरु झाला लोकसभेचा प्रचार.....

लोकसभा निवडणूकीची घोषणा होण्यास अद्याप वेळ असतानाच बारामतीत मात्र प्रचाराचेच वातावरण असल्याचे बघायला मिळत आहे.

मिलिंद संगई

बारामती - लोकसभा निवडणूकीची घोषणा होण्यास अद्याप वेळ असतानाच बारामतीत मात्र प्रचाराचेच वातावरण असल्याचे बघायला मिळत आहे.

शुक्रवारी (ता. 16) उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे एकाच दिवशी बारामतीत उपस्थित होते. दोघांचे कार्यक्रम स्वतंत्र असले तरी निवडणूकीच्या प्रचाराचाच फील दोघांच्याही कार्यक्रमांना असल्याने निवडणूकीपूर्वीच बारामतीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

अजित पवार यांनी आज काहीसे भावूक होत तर सुप्रिया सुळेंवर थेट टीका करत कार्यकर्त्यांना साद घातली. सुप्रिया सुळे यांच्याही नवीन पक्ष कार्यालयाचे बारामतीत उदघाटन झाले व त्यांनीही कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधत भेटी गाठी घेतल्या.

अजित पवार यांनी बूथ कमिटी कार्यकर्त्याच्या मेळाव्यात बोलताना आपल्याला कुटुंबात एकटे पाडले जात असल्याची खंत बोलून दाखवली, कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी असल्याच्या घोषणा दिल्यानंतर काही काळ त्यांचा कंठ दाटून आला होता, मात्र बारामतीकर पाठीशी आहेत असा विश्वास व्यक्त करत निवडणूकीला सामोरे जाण्याची तयारी त्यांनी बोलून दाखवली.

बारामती लोकसभा मतदारसंघात एकीकडे सुप्रिया सुळे उमेदवार असणार हे निश्चित आहे, दुसरीकडे अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांनाच रिंगणात उतरविण्याची तयारी सुरु केल्याचे आज स्पष्ट झाले. आजच्या मेळाव्यात त्यांच्या नावाची घोषणा अपेक्षित होती, मात्र राज्यस्तरावर महायुतीची एकत्र यादी जाहीर करण्यात येणार असल्याने आज नाव जाहीर झालेले नाही. संकेत विचारात घेता आता नणंद विरुध्द भावजय अशी लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

देशातील सर्वाधिक लक्षवेधी लढत...

पवार कुटुंबातील नणंद भावजय यांच्यातील ही लढत देशातील सर्वाधिक लक्षवेधी लढतींपैकी एक होणार यात शंका नाही. अजित पवार यांच्या बाजूने भाजपसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना, रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष यांची ताकद उभी राहील, तर सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कॉंग्रेस सह उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद उभी असेल.

प्रचारच झाला सुरु....

सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटी गाठी घेत, समारंभाना उपस्थिती लावत प्रचाराचाच प्रारंभ केलेला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर कालावधी मर्यादीत असेल, त्याने दोन्ही बाजूंकडून प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT