Ajit Pawar sakal
पुणे

Ajit Pawar : मुळशीच्या पाण्यासाठी पंतप्रधान मोदींची मदत घेणार

पुणे शहर व जिल्ह्याची तहान भागवायची असेल तर मुळशी धरणाच्या पाण्याशिवाय पर्याय नाही.

सकाळ वृत्तसेवा

केडगाव - मुळशी धरणाचे पाणी मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मदत घेणार आहे. पुणे शहर व जिल्ह्याची तहान भागवायची असेल तर मुळशी धरणाच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. हे धरण टाटा कंपनीचे आहे.

टाटा कंपनीकडून पाणी मिळवायचे असेल तर ते काम फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. भारताचा, महाराष्ट्राचा, पुणे जिल्हाच्या अन् दौंड तालुक्याचा विकास करायचा असेल मोदींच्या विचारांचा खासदार निवडून दिला पाहिजे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आमदार कुल यांनी आज शक्ती प्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यावेळी पवार बोलत होते.

यावेळी आमदार राहुल कुल, प्रेमसुख कटारिया, वासुदेव काळे, नामदेव बारवकर, तानाजी दिवेकर, नंदू पवार, कांचन कुल, राहुल शेवाळे, गणेश जगदाळे, नीलकंठ शितोळे, हरिश्चंद्र ठोंबरे, मंगलदास बांदल, वसंत साळुंके, ज्ञानदेव ताकवणे, आप्पासाहेब हंडाळ, विलास गव्हाणे, मोहन म्हेत्रे, राजेश पाटील, दादासाहेब केसकर, संपत आटोळे आदी उपस्थित होते.

कटारिया म्हणाले, दौंड तालुक्यातून सुनेत्रा पवार यांना मताधिक्य नक्की मिळेल परंतु विजया नंतर आम्हाला बारामती सारखा विकास पाहिजे आहे.

कुल म्हणाले, पाणी विषयात सहकार्य करा. नेहमी प्रामाणिक पणे काम केले. पण त्याचे चीज झाले नाही. आमच्या कामाची दखल या पुढे घेतली जावी. कोणतीही अट न घालता काम करत आहोत. बुडीत बंधारे , क्रीडा संकुल, कुरकुंभ मोरी, पोलिस वसाहत, लोहमार्गावरील उड्डाणपूल असा चौफेर विकास मार्गी लागली आहेत. ओबीसींच्या मागण्या मांडत आहोत. गेल्या २३ वर्षात कोणी टीका केली तरच उत्तर दिले आहे. माझे वडील सुभाष कुल यांचा वसा केवळ कार्यकर्त्यांमुळे आम्ही चालवू शकलो हे सांगताना राहुल कुल यांना गहिवरून आले. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांना धीर दिला.

दौंडला शैक्षणिक संकुल उभारणार

दौंड तालुक्यात इंदापूर व बारामतीच्या धर्तीवर शैक्षणिक संकुल उभारणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. देशात मोदी व राज्यात मी कामाचा माणूस आहे. भावनिक होऊन मतदान करू नका. दौंडच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. मात्र त्यासाठी राज्यात व देशात मोदींच्या विचारांचे सरकार पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे पुतळे नव्हेत तर स्मरण, भिडे गुरुजींसारखे गुरुजी छत्रपतींचा इतिहास तरुणांमध्ये रुजवतायत : मुख्यमंत्री फडणवीस

Pune Traffic News : आरबीआय मेट्रो स्थानकाजवळ अपघात; वाहतूक कोंडीमुळे एक मार्गिका बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Latest Marathi News Live Update : मुंढवा जमीन प्रकरणात आरोपी शितल तेजवानीच्या जामीन अर्जावर सुनावणी

Kolhapur Municipal Corporation : अर्धशतकानंतरही विकास खुंटलेला; संकटांच्या चक्रव्यूहात अडकलेली कोल्हापूर महापालिका

New Year 2026 Trip Idea: नवीन वर्षाची सुरूवात करा हटके पद्धतीने! गर्दीपासून दूर असलेली भारतातील ‘ही’ ठिकाणे एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT