Sunetra Pawar sakal
पुणे

Sunetra Pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांनी साधला मनसे पदाधिका-यांशी संवाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत महायुतीसोबत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मिलिंद संगई

बारामती - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत महायुतीसोबत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याच्या सुचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातही मनसेचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

बारामतीतील बैठकीस मनसेचे नेते दिलीप धोत्रे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अँड. सुधीर पाटसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष पोपट सुर्यवंशी, संतोष दासवडकर, मनसे विद्यार्थी सेना संघटक प्रशांत कनोजीया आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुधीर पाटसकर यांनी सांगितले की मनसे कडून दिलेला पाठिंबा हा बिनशर्त व कसली राजकीय अपेक्षा भविष्यात न ठेवता दिलेला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्ते जोमाने काम करुन सुनेत्रा पवार यांच्या विजयात वाटेकरी ठरतील अशी ग्वाही मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

मनसे नेते राज ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबाशी माझा व्यक्तिगत स्नेह राहिला आहे, त्यातही शर्मिला ठाकरे या माझ्या खास मैत्रिण आहेत असं सुनेत्रा पवार यांनी या वेळी आवर्जून नमूद केले. माझ्या या निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या मनसैनिकांची जाणीव ठेवून त्यांच्या हाकेला नेहमीच प्रतिसाद असेल असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China Flood Latest News : चीनमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 2 तासांत 200 मिमी पाऊस, Qinzhou शहरात ढगफुटीसदृश परिस्थिती

Jalgaon Temperature : तापमानाचा पारा ४४ पार; उष्माघाताचा धोका वाढला!

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

IPL 2026 : मोठा दावा... "चेन्नई सुपर किंग्स Playoff च्या शर्यतीतून बाहेर पडल्यावरच MS Dhoni खेळणार! कदाचित तो निरोपाचा सामना"

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार ! बंगला भाड्याने घेऊन गार्डनमध्ये सुरू केली गांजाची शेती, तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT