Crime esakal
पुणे

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे परिसरात मतदान संपल्यानंतर तिघांनी पिस्तुलातून जमिनीवर गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे परिसरात मतदान संपल्यानंतर तिघांनी पिस्तुलातून जमिनीवर गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (ता. ७) रात्री रामनगरमधील शक्ती चौकात घडली. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर, अन्य एकजण अद्याप फरार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात वारजे परिसरातील काही भाग येतो. मंगळवारी मतदान शांततेत पार पडले. परंतु वारजे भागातील रामनगर परिसरात दुचाकीवर आलेल्या तिघांनी पिस्तुलातून गोळीबार केला. या घटनेत कोणी जखमी झरले नाही. त्यानंतर आरोपी कात्रजच्या दिशेने पसार झाले. ही माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मिळाली.

याबाबत माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोज शेडगे घटनास्थळी दाखल झाले. आरोपींनी परिसरात दहशत पसरविण्यासाठी जमिनीवर गोळीबार केला. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याचे माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT